BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजप मध्ये NCP activists from Shirala in BJP

शिराळा: येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार मानसिंगराव नाईक गटाचे प्रमुख कार्यकर्ते जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस विनोद विश्वासराव पाटील, युवा नेते बाबासाहेब महादेव गायकवाड, काकासाहेब पवार, अशोकराव कदम, सुनिल सदाशिव गायकवाड  बाजीराव दत्तात्रय कदम,संदीप गायकवाड यांनी भाजपा नेते,जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.त्याचे स्वागत सत्यजित देशमुख  यांच्या हस्ते करण्यात आले.     यावेळी भाजपा शिराळा मंडल अध्यक्ष हणमंतराव पाटील, रणजितसिंह नाईक,प्रतापराव यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य के. डी. पाटील,सम्राट शिंदे,शिराळा शहर भाजपा अध्यक्ष कुलदीप निकम,विक्रम पाटील,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रदीप पाटील,प्रमुख उपस्थित होते.

सत्यजित देशमुख म्हणाले, स्व. शिवाजीराव देशमुख यांना जनतेचा आशीर्वाद कायम होता. शिराळा तालुका डोंगरी तालुका म्हणून पूर्णत्वास  आला.ते अपक्ष म्हणून पहिल्यादा निवडून आले. आणि वसंतदादा ची कायम साथ धरली. परंतु या मतदार संघाचे विद्यमान आमदार यांनी नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे च्या विरोधात मतदान केले. स्वतः पराभूत उमेदवार यांनी जाहीर सांगितले. आमदारांचे नाव घेवून ही यांची निष्ठा.गैरविश्वासू राजकारण आपल्याला संपवायचे आहे. 

     यावेळी भिमराव पाटील,शेखर भोसले,संभाजी नलवडे,जयसिंग गायकवाड, शिवाजी कदम,  नामदेव गायकवाड, अशोक गायकवाड, विद्याधर कुलकर्णी ,विजय धस,निखिल शिंदे,दिलीप कुंभार,अरविंद शिंदे,सचिन नलवडे,अभिजित शेणेकर,अभिजित यादव,अमोल काळे,शुभम देशमुख,ऋषिकेश भोसले अजय नलवडे,रणजित कदम,प्रदीप कदम,रमेश पाटील,भैरव रातसवडेकर,दर्शन जोशी, उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments