BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वारणा धरण ९९ टक्के भरलेWarna dam is 99 percent full



 शिराळा,ता.१२ : वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात  पावसाचा जोर कमी झाल्याने  धरण पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी चार   दिवसापासून धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहे.त्यामुळे विद्युत निर्मितीतून १३३०   क्युसेकने विसर्ग सुरु आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ३४.४० टीएमसी असून धरणात सध्या ३४.१ ७ टी.एम.सी  पाणीसाठा आहे. धरण पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी एक फुट पाणी वाढण्याची   गरज आहे. 

 २४ तासात चांदोली ५ तरआठ तासात ० असा  आज अखेर एकूण ३६९१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सायंकाळी चार वाजता  धरणाच्या पाण्याची पातळी ६२६.६५ मीटर तर पाणीसाठा ९६७.४३१   द.ल.घ.मी.होता.धरणात ३४.१७ टी.एम.सी.म्हणजे ९९.१३  टक्के पाणीसाठा झाला होता. धरणात  २९७८   कुसेसने पाण्याची आवक सुरु आहे.चार  दिवसापासून  पासून  पावसाने पुर्ण उघडीप दिली असल्याने  धरणाचे दरवाजे बंद ठेवले आहेत. त्यामुळे धरण पाणी पातळीत हळूहळू वाढ होत आहे. पावसाचा जोर वाढला तर धरणातून विसर्ग सोडला जाणार आहे.  


Post a Comment

0 Comments