जिल्ह्यातील कोणत्या मतदार संघात कोणाला किती मते पडली हे खालील तक्त्यावर क्लिक करून वाचा
सांगली विधानसभा मतदार संघ
| सांगली जिल्हा विधानसभा निवडणूक २०२४ | |||
|---|---|---|---|
| सांगली | मिरज | तासगाव-कवठेमहांकाळ | खानापूर |
| शिराळा | इस्लामपूर | जत | पलूस-कडेगाव |
सांगली : तिरंगी लढत
| सांगली विधानसभा उमेदवार | ||||
|---|---|---|---|---|
| अ.क्र | उमेदवाराचे नाव | पक्ष | मतदान | विजयी |
| 1 | जयश्री पाटील | अपक्ष | ३२७३६ | |
| 2 | सुधीर गाडगीळ | भारतीय जनता पार्टी | १,१२,४९८ | विजयी |
| 3 | पृथ्वीराज पाटील | काँग्रेस | ७६,३६३ | |
सांगली: ७ नोव्हेंबर२०२४ : सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विरोधात बंडखोरी केल्याप्रकरणी जयश्री मदन पाटील यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. पाटील यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पक्षाने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी बंडखोरी केली. त्यांची समजूत काढण्यासाठी चेत्रीथलांनी संपर्क साधला होता. त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली जाईल, असा शब्द दिला होता.
वसंतदादा घराण्याचे काँग्रेससाठी मोठे योगदान आहे. पक्षाने आम्हाला अनेक पदे दिली. मी पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहिले. पक्षाचे विचार तळागाळात नेले, गेली काही वर्षे वसंतदादा घराण्याला डावलले जात आहे. यंदा मी मेरिटवर उमेदवारी मागितली होती. षडयंत्र रचून ती डावलली गेली. महाविकास आघाडीचे घटक म्हणून खासदार विशाल पाटील यांनी माजी उमेदवारी आघाडीचीच आहे, असे जाहीर केले आहे.
जयश्री पाटील
सांगली जिल्ह्यात ८ विधानसभा मतदार संघात ८५ जणांनी माघार घेतली असल्याने निवडणूक रिंगणात ९९ उमेदवार आहेत.शिराळ्यात केवळ सहा तर तासगाव -कवठेमहांकाळ येथे सर्वाधिक १७ उमेदवार आहेत.
मतदारसंघ व उमेदवार
मिरज -१४ ,सांगली -१४ ,इस्लामपूर -१२ ,शिराळा -६,पलूस-कडेगाव -११ ,खानापूर -१४ ,तासगाव -कवठेमहांकाळ १७ ,जत -११
सांगली :२८ ऑक्टोबर :सांगलीतून संग्राम मोरे, पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील, शिवाजी डोंगरे, आरती कांबळे, रफीक शेख, वंचित बहुजन आघाडीकडून अल्लाउद्दीन काझी, इम्रान जमादार यांनी अर्ज भरले.
आमदार सुधीर गाडगीळ यांनी गुरुवारी (ता.२४ )अर्ज दाखल केला आहे.
सांगलीतून काँग्रेसतर्फे पृथ्वीराज पाटील
सांगली.२६.ऑक्टोबर :सांगली विधानसभा मतदारसंघाची काँग्रेसची उमेदवारी अखेर शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना जाहीर करण्यात आली. काँग्रेसच्या एआयसीसी बैठकीनंतर रात्री उशिरा समितीचे सचिव के सी. वेणुगोपाल यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली.सांगली विधानसभा मतदारसंघातून पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्री पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली होती. दोन्ही बाजूंनी उमेदवारीसाठी प्रचंड ताकद लावण्यात आली होती.पृथ्वीराज पाटील यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा दाखला देत उमेदवारीवर दावा केला होता. जयश्री पाटील यांनी गेल्यावेळी तुम्हाला संधी दिली होती. यावेळी मला संधी द्या, अशी मागणी करत उमेदवारीवर दावा केला होता.आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी दोघांमध्ये तडजोड करण्यासाठी बरेच प्रयत्न केले, कार्यकर्त्यांच्या दोन बैठका, तर नेत्यांसमोर ही अनेक बैठकांमध्ये त्यांनी संवाद साधला होता.
मुक्त मराठी लघुचित्रपट
-
व्रण मराठी लघुचित्रपट
टमरेल मराठी लघु चित्रपट
-
खराटा मराठी लघु चित्रपट
कहर मराठी लघुचित्रपट
0 Comments