BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा पंचायत समिती ‘यशवंत पंचायतराज अभियानात राज्यात तृतीय व पुणे विभागात प्रथम

 



 आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .

 

   


शिराळा,ता.६:महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘यशवंत पंचायतराज अभियान २०२३-२४ ’अंतर्गत शिराळा पंचायत समितीने राज्यस्तरीय तृतीय क्रमांक पटकावून १५  तर पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवून ११ असे एकूण  २६  लाख रुपयांची बक्षिस मिळवून तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.शिराळा पंचायत समितीची  ही कामगिरी समस्त शिराळकरांना  अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे.

राज्यस्तरावर अत्युत्कृष्ट "पंचायत राज संस्थांची निवड करण्यासाठी राज्यस्तरीय मूल्यांकन समितीची  २४ फेब्रुवारी, २०२५ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्यस्तरीय पारितोषिक निवड समितीने, राज्यस्तरीय पडताळणी समितीकडून प्राप्त झालेल्या अहवालाची तपासणी करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी अत्युत्कृष्ट तीन जिल्हा परिषदा व तीन पंचायत समित्यांची राज्यस्तरावर आज  निवड जाहीर केली आहे.

तालुक्याच्या ग्रामीण भागात शाश्वत विकास, पारदर्शक प्रशासन, जनसहभाग, डिजिटल गाव, स्वच्छता, पाणी व्यवस्थापन,शिक्षण व आरोग्य यासारख्या विविध घटकांवर प्रभावी अंमलबजावणी करून शिराळा पंचायत समितीने ‘यशवंत पंचायत’ म्हणून आपली ओळख राज्यपातळीवर निर्माण केली आहे.पंचायत समितीच्या या यशामध्ये जिल्हा परिषद सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, परिणामकारक मार्गदर्शन आणि तंत्राधिष्ठित नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्यांच्या प्रेरणेमुळेच शिराळा पंचायत समितीने ही उल्लेखनीय झेप घेतली आहे..अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे व शशिकांत शिंदे तसेच गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, तत्कालीन गटविकास अधिकारी संतोष राऊत, सहायक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धती, समन्वय आणि तालुका पातळीवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे एकत्रित प्रयत्न यामुळे ही यशस्वी अंमलबजावणी शक्य झाली.

या यशाबद्दल खासदर धैर्यशील माने,आमदार सत्यजित देशमुख,सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष  मानसिंगराव नाईक, माजी  मंत्री  शिवाजीराव नाईक, उपविभागीय अधिकारी  श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार शामला खोत यांनी शिराळा पंचायत समितीचे अभिनंदन केले आहे.

कोणत्या ही गोष्टीचा ध्यास घेवून मनापासून काम केले तर यश निश्चित मिळते हे या मिळालेल्या यशावरून सिद्ध होत आहे.या यशामध्ये पंचायत समितीतील सर्व विभागप्रमुख, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे मोलाचे योगदान आहे. हे यश प्रत्येकाच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे.

प्रकाश पोळ, (गटविकास अधिकारी, पंचायत समिती शिराळा)

सलग तीन वर्षात पाच  पुरस्कार   

गत वर्षी यशवंत पंचायतराज  अभियान पुरस्कारामध्ये सन २०२२-२३ साठी शिराळा पंचायत समितीने पुणे विभागात प्रथम क्रमांक तर दोन वर्षा पूर्वी  तृतीय क्रमांक पटकावला  होता. यावर्षी फेब्रुवारीत पुणे विभागात दुसरा क्रमांक पटकावला होता. आज   २०२३-२४ ’साठी  राज्यात तृतीय व पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळाला असल्याने  सलग तीन वर्षात पाच पुरस्कार मिळाले आहेत. 

राज्यस्तर पुरस्कार प्राप्त पंचायत समिती

१)पंचायत समिती कळमेश्वर, जि. नागपूर-प्रथम 

२)पंचायत समिती जामनेर, जि. जळगाव-द्वितीय 

३)पंचायत समिती शिराळा, जि. सांगली-तृतीय .

 पुणे विभागात

१) पंचायत समिती शिराळा, जि. सांगली-प्रथम

२) पंचायत समिती पंढरपूर, जि. सोलापूर-द्वितीय

३) पंचायत समिती खानापूर, जि. सांगली- तृतीय 


Post a Comment

0 Comments