BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मोरणाराज कामगार असोसिएशनचा स्नेह मेळावा व सन्मान सोहळा संपन्न





 आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .

 

   


शिराळा,ता.२:येथे मोरणाराज कामगार असोसिएशनच्यावतीने १ मे जागतिक कामगार दिनानिमित्त स्नेह मेळावा व सन्मान सोहळा व्यापारी असोशिएशन येथे संपन्न झाला.यावेळी कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ही घेण्यात आले.त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.

 असोसिएशनच्यावतीने समाजातील विविध क्षेत्रातून गोरगरीब लोकांसाठी शैक्षणिक,सामाजिक,वैद्यकीय बांधकाम,पत्रकारिता, उद्योग व आरोग्य यांचे माध्यमातून उपेक्षितांच्या विविध प्रश्नांवर प्रामाणिक व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यावेळी आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्तेआदर्श शिक्षक प्रा.डॉ.तानाजी हवलदार, आदर्श वैद्यकीय सेवा डॉ.कृष्णा जाधव,आदर्श उद्योजक  सूर्यकांत जाधव,आदर्श पत्रकार शिवाजीराव चौगले,आदर्श आरोग्य सेवक विजय कांबळे,आदर्श अभियंता रोहन शिंदे यांना गौरविण्यात आले.स्वराली चौगुले व शब्दाली चौगुले ह्या अभियंता झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.

यावेळी आमदार देशमुख म्हणाले,मारुती रोकडे यांनी कोणती ही  राजकीय पार्श्वभूमी नसताना कामगारांसाठी सामाजिक दृष्टिकोनातून केलेले संघटन कौतुकास्पद आहे.कामगार हाच खरा गौरवशाली महाराष्ट्राचा कणा आहे.बांधकाम कामगारांच्या मुलांना तात्काळ शिष्यवृत्ती देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.३ वर्षे नोंदणी असणाऱ्या कामगारांना अटल घरकुलचा लाभ तात्काळ स्वयं घोषणा पत्रावर मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु आहे.ही सामाजिक चळवळ मारुती रोकडे यांनी पुढे घेऊन जावे. 

 वाळवा शिराळा वनश्री को-ऑपरेटिव्ह संघाचे अध्यक्ष सम्राट महाडिक म्हणाले,कामगारांची संघटना व संघटन महत्वचे आहे.या जोरावर आता कामगारांना अनेक शासकीय योजनांचा लाभ  मिळत आहेत.या कामगार असोसिएशनला आमची नेहमीच सहकार्य राहील.

सचिन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कोल्हापूरचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.विकास बामणे यांनी कामगारांना हृदयआरोग्या विषयी घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले. 

यावेळी प्रा. सम्राट शिंदे,डॉ,कृष्णा जाधव,डॉ.तानाजी हवलदार  यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाची स्वागत व प्रास्ताविक  कामगार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष  मारुती रोकडे यांनी केले.सूत्रसंचलन वृषाली पवार यांनी केले.

 यावेळी डॉ.नितीन जाधव,सुभाष इंगवले, के.एन.कुंभार, प्रतापराव पाटील,संदीप मदने,सुनील तांदळे,शालन मोहिरे,मंगल पाटील,पूनम रोकडे,अमर पाटील,बसवेश्वर शेटे,माजी नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के,वाकूर्डे खुर्द महिला सरपंच शीतल पाटील,करमाळे सरपंच सचिन पाटील,प्रज्ञा चरणकर,अशोक सावंत,शिवाजी कदम,रवी यादव,अमोल साठे,पूजा साठे,राकेश कांबळे,अवधूत गुरव,राजू कांबळे,मनीषा पाटील,कृष्णा पवार,विद्या कांबळे,सादिक पिरजादे,पार्थ कांबळे,सदानंद टिळे,आबाजी मुजावर,नितीन गायकवाड,गोरख कांबळे,प्रल्हाद जाधव, उपस्थित होते.आभार पंकज खोत यांनी मानले.

Post a Comment

0 Comments