BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गुरुवारी शिराळा येथील बीएसएनएलकार्यालय येथे घेराव आंदोलन






 आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .

शिराळा:रांजणवाडी (ता.शिराळा ) येथील बीएसएनएल टॉवरची कायम स्वरुपी दुरुस्ती न झाल्यामुळे मेणी व परिसरातील सर्व वाड्या वस्तीवरील नागरीरिक एकत्रित येऊन गुरुवार २२ मे रोजी दुरसंचार निगम बीएसएनएल, कार्यालय शिराळा येथे बेमुदत घेराव आंदोलन करणार असल्याची माहिती  सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी दिली.

 नाईक म्हणाले,देशाला स्वातंत्र्य मिळून ७६  वर्षे पूर्ण झाली तरीही शिराळा तालुक्यातील अनेक विभागांमध्ये मूलभूत सोयी सुविधा पासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. तालुक्यातील मेणी,आटूगडेवाडी, पोळवस्ती, रांजणवाडी, बेंगडेवाडी, सावंतवाडी,माळवाडी,शिरसटवाडी,खटिंगवाडी हा भाग डोगरी असल्यामुळे या परिसरामधील नागरीकाच्या सोयीसाठी दुरसंचार विभागामार्फत रांजणवाडी येथे  खासबाब म्हणून मोबाईल टॉवर  मंजूर करून बसवला आहे.या विभागात केंद्र शासनाच्या बीएसएनएल शिवाय इतर कोणत्याही कंपनीची   मोबाईल सेवा उपलब्ध नाही. हा टॉवर सातत्याने नादुरुस्त असल्यामुळे या परिसरातील नागरीकांची फार मोठी गैरसोय होत आहे. सदरची गावे ही डोंगरी परिसरामध्ये वसलेली असून येथील बहुतांश लोक रोजगारानिमित्त मुंबई, पुणे व इतर ठिकाणी बाहेर गावी आहेत. त्यामुळे या परिसरातील सर्व गावामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरीक आहेत. त्याना दैनदिन कामानिमित्त व अडचणीसाठी विचारपुस करणेसाठी सातत्याने बाहेरगावी असणाऱ्या नातेवाईकांशी संपर्क करणे गरजेचे आहे.हा हेतु ठेवून या परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी रांजणवाडी येथे बीएसएनएल कंपणीकडून टॉवरची उभारणी केली आहे. परतू हा टॉवर महिन्यातुन ७० टक्के वेळी बंद असतो. मोबाईल टॉवर बंद राहिल्याने या परिसरातील नागरिकांना बाहेरील कोणाशीही संपर्क साधता येत नाही. प्रामुख्याने मुंबई येथील आप्त स्वकीयांचा संपर्क तुटतो मोबाईल बंद राहिल्याने तातडीची वैद्यकीय मदत मिळवणे देखील दुरापस्त होत आहे. अशा प्रसंगी वेळेवर रुग्णवाहिका व वाहन बोलविता न आलेले अनेक रुग्णांना आपला प्राण देखील गमवावा लागला आहे. याशिवाय कोणतेही ऑनलाईन व्यवहार शासकीय कामकाज करण्यामध्ये अडचणी येत असलेले अनेक पात्र लाभार्थी व नागरिकांना शासकीय योजनेपासुन वंचित राहावे लागत आहे.

          मोबाईल टॉवर सातत्याने बंद राहत असल्यामुळे येथील नागरिकांचे होणारे हाल आता सहनशीलतेच्या पलीकडे गेले आहेत. दूरसंचार विभागाचे या संदर्भात होणारे सततचे दुर्लक्ष लोकांच्या प्रचंड रोषाचे कारण झाले आहे. वारंवार पाठपुरावा व प्रत्यक्ष चर्चा करुनही याबाबत कोणतीही कायमस्वरुपी दुरुस्ती अथवा सुधारणा  अधिकाऱ्यांच्या कडून न झाल्याने नाईलाजास्तव मेनी व परिसरातील नागरिकांना  आता या संदर्भात आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.

Post a Comment

0 Comments