शिराळा नचिकेता गौरव कुंज माध्यमिक विद्यालय रेड (शिराळा) या विद्यालयाने इयत्ता दहावीच्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. शाळेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कारकरण्यात आला .
यावेळी संस्थेचे सचिव अजय पाटील म्हणाले, नचिकेतला गौरव कुंज शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. शाळेच्या यशामध्ये विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचे कष्ट, जिद्द आणि चिकाटी स्पष्ट दिसून येत आहे. आपणं जे काबाडकष्ट करतो ते मुलांच्या भविष्यासाठी करतो. त्यामुळे पालकांनी ही शिक्षकांप्रमाणेच आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. कारण तेच आपली संपत्ती आहेत. या परिक्षेत नऊ विद्यार्थीनींना ९० टक्के च्यापुढे गुण आहेत. तर १३ विद्यार्थ्यांना ८० टक्के आहेत.
यामध्ये अमृता गोरख माने ही (९८.४०) मिळवून तालुक्यात तिसरी व केंद्रात पहिली, अश्विता सचिन केसरे ही (९६) गुण मिळवून तालुक्यात सातवी व केंद्रात दुसरी, फाइजा नाझीर मुल्ला (९५.२०)गुण केंद्रात तिसरी ,शर्वरी शरद पवार (९४.६०) केंद्रात चौथी, सुमित विजय पाटील (९३.२०)केंद्रात पाचवा, वैष्णवी दीपक पाटील (९२.४०)केंद्रात सहावी, प्राजक्ता चंदर पाटील (९१.८०)केंद्रात आठवी, भार्गवी संकेत कचरे( ९०.२०) केंद्रात दहावी, वैभव तेजस पाटील (९०.२० )अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी उज्वल यश प्राप्त केले .
प्रास्ताविक व स्वागत विनायक जाधव यांनी केले. संचालिका तेजश्री पाटील, अश्विनी पाटील, राजीव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मंजुश्री चव्हाण, उदय चव्हाण, विशाल पाटीलसह मुख्याध्यापक संजय वीर, वाहतूक विभाग प्रमुख प्रवीण पाटील, आर एस पाटील यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.


.jpg)
0 Comments