शिराळा :शिराळा तालुक्यात सर्वांना बरोबर घेऊन शिवसेना (शिंदे गट) पक्षाची बांधणी मजबूत करून तालुक्यात ग्रामपंचायत ते जिल्हापरिष निवडणुकीत भगवा फडकवू असे प्रतिपादन नूतन तालुका अध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक यांनी केले.
पृथ्वीसिंह नाईक यांची शिराळा तालुका शिवसेना प्रमुखपदी निवड झाल्याने शिराळा येथील शिवसेना संपर्क कार्यालयात निवडीचे पत्र देताना प्रदान प्रसंगी बाेलत हाेते. यावेळी सांगली जिल्हा उपप्रमुख नंदकिशोर नीलकंठ यांची प्रमुख उपस्थिती होती.
पृथ्वीसिंग नाईक म्हणाले, राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम बघून दसरा मेळाव्यामध्ये शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. शिराळा नगरपंचायतीवरच नाही तर जिल्हापरिषद, पंचायत समिती व तालुक्यातील ग्रामपंचायतींवर सुध्दा भगवा फडकवायचा आहे.युवकांचे काम सगळीकडे बाेलत असते. लहानपणापासूनच समाजकार्यांची आवड आहे. शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी जरी माझी निवड झाली असली तरी तुम्हीच तालुका प्रमुख असल्याचे समजून काम करा.
शिवसेना उपजिल्हा प्रमुख नंदकुमार निळकंठ म्हणाले, शिवसेना हे कुटूंब आहे. पृथ्वीसिंग नाईक यांची तालुका प्रमुख निवड झाल्यामुळे शिराळा शहरासह तालुक्यात भगवा फडकणार आहे. यात काही तीळ मात्र शंका नाही.जिल्ह्याकडून जी काही ताकद लागेल ती मिळेल. चांगला विचारांचा तालुका प्रमुख आपल्याला मिळाला आहे.
प्रारंभी नाईक यांना शिवसेना सांगली जिल्हा उपप्रमुख नंदकुमार निळकंठ यांच्या हस्ते तालुका प्रमुख म्हणून निवड झालेले निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी बी.एस. पाटील,निलेश आवटे यांनी मनाेगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी विश्वप्रतापसिंह नाईक, दिपक गायकवाड, आबा खबाले, वसंत निकम, प्रा. राजसिंह पाटील, शंकर डांगे, दिलीप घाटगे,सचिन सोनटक्के , शिराळा तालुका महिला अध्यक्ष सारिका पाटील,जिल्हा युवासेना उपाध्यक्ष स्वप्नील निकम,शिराळा तालुका युवासेना अध्यक्ष आकाश पाटील शिराळा व वाळवा तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित हाेते.


.jpg)

0 Comments