शिराळा,ता.१९:मांगले (ता.शिराळा) येथे तीन ठिकाणी चोरी प्रकरणी तीन अट्टल चोरट्या पैकी एका संशयित सराईत हंबीरराव ऊर्फ अमित सावळा गोसावी (वय ४२,रा.गोसावीवस्ती कोडोली ता. पन्हाळा जिल्हा कोल्हापूर) या चोरट्यास शिराळा पोलिसांनी अटक केली.त्याच्या कडून ५ लाख ५५हजार १३५रूपये मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणातील दोन संशयीत आरोपी दिपक उर्फ लंगड्या गोसावी, अनिल उर्फ बारक्या गोसावी यांनी (दोन्ही रा तासगाव )अद्याप फरार आहेत.संशयित हंबीरराव गोसावी यास शिराळा न्यायालयाने १जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याबाबत फिर्याद रोहन महादेव घेवारी (रा.मांगले) यांनी दिली होती.
याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मांगले येथे चोरट्यांनी गुरूवार १मेला रात्री ९.४५ ते शुक्रवार २ मे सकाळी ८दरम्यान चोरी केली होती.यामधे परमिट रूम मधून ३०हजार रुपये दारू,रूद्राक्ष मल्टीपर्पझ हॉल मधून १५हजार रुपये अॅफ्लीफायर ,५हजार इको मशीन,१हजार माईक,२हजार पिवळे झुंबर,लाईट ९हजार एलईडी तसेच दत्तात्रय यादव यांच्या घरातील २हजार रुपये,गॅस बर्नर व पितळी घागरी नेल्या होत्या.
पोलीस हवालदार अमर जाधव व पोलीस नाईक उमेश शेटे यांनी गोपणीय व तांत्रिक माहीत अधारे सीसीटीव्ही फूटेजच्या सहाय्याने पोलीस अधीक्षक संदीप घुगे,पोलीस उपअधिक्षक मंगेश चव्हाण,पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम,सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल अतिग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून हंबीरराव गोसावीस पकडून त्याच्या कडून ५लाख ५५हजार १३५रूपये मुद्देमाल हस्तगत केला. त्या मध्ये चोरी साठी वापरलेली ५लाख रूपये चारचाकी , ९८८५हजार रूपयांची बिअर व दारू, १५हजार अॅपलीफायर, ५हजार ई को मशीन, २५०रूपये माईक, १हजार मोबाईल, १५हजार डी व्ही आर ६हजार फोकट ३हजार वायर यांचा समावेश आहे.
सांगली,कोल्हापूर रत्नागिरी जिल्ह्यात चोरीचे नेटवर्क
संशयित आरोपी गोसावी यांच्या घरातून चोरीचा माल पोलिसांनी हस्तगत केला.अलोरे (ता.चिपळूण )येथे मार्च २४ मध्ये वीज मंडळ चोरी प्रकरणात दोन वेळा अटक करण्यात आले होती.पेठ वडगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दोन वेळा चोरीचे गुन्हे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
डिव्हीआरने चोरी उघडकीस आली.
पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्यात दोन सीसीटीव्ही डिव्हीआर सापडले.यामधे हे डिव्हिआर २२मार्च , २३एप्रिल रोजी मंगरायाची वाडी (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील चोरीतील आहेत असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. याठिकाणी एका बॉटलिंग प्लॅन्ट मधील दोन वेळा चोरी करून तीन लाख रुपये किमतीचे १३११०गॅस सिलेंडर चे पितळी व्हॉल्व चोरीची घटना घडली होती. डिव्हीआर मुळे चोरीचा छडा लागला .
बर्नरने दिली तपासाला गती
मांगले येथील तिन्ही चोरीचा पोलीसंच्याकडे तपासाबाबत पुरावा नव्हता.पण मांगले येथील यादव यांच्या घरातून गॅस बर्नर व पितळी घागरीची झालेली चोरी आणि काही लोकांनी पोलिसांना तपासाच्या दृष्टीने दिलेला महत्वाचा क्लू . मुळे तो चोरटा भंगार विक्रेता असावा असा अंदाज बांधून त्या नुसार पोलिसांनी तपास यंत्रणा राबवून चोरीचा उलगडा केला.


.jpg)

0 Comments