शिराळा,ता.१६: गिरजवडे (ता. शिराळा) येथील लोकनियुक्त सरपंच सचिन देसाई हे सदस्यांना विश्वास घेत नसल्याच्या कारणावरून त्यांच्या विरोधात पाच सदस्यांनी अविश्वास ठरावाबाबत तहसीलदार शामला खोत-पाटील यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला आहे.
या प्रस्तावात म्हटले आहे, गिरजवडेचे लोकनियुक्त सरपंच सचिन देसाई हे सदस्यांना विश्वास घेत नाहीत.त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य मोहन खशाबा मुळीक,अजय नामदेव पाटील, इंदुबाई नामदेव सावंत, स्वप्राली कृष्णा नलवडे आत्माराम बाबा शेळके या पाच ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदार श्यामला खोत पाटील यांच्याकडे अविश्वासा ठराव बाबत अर्ज दाखल केला आहे. विद्यमान लोकनियुक्त सरपंच सचिन देसाई हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या गटाचे आहेत. सन २०२२ राेजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये सदस्य निवडणूक बिन विरोध झाली होती.
फक्त सरपंच पदासाठी निवडणूक लागली होती.त्यावेळी सचिन देसाई हे लाेकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले हाेते. बिनविराेध निवडणूकीची परंपरा असणाऱ्या गावाला २०२२२ साली ग्रामपंचायत निवडणूक झाली. ग्रामपंचायत मध्ये सध्या भाजपाचे ५ तर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पार्टी चे २ सदस्य आहेत. एक आरक्षित रिक्त जागा असून एकूण सरपंचासह ८ सदस्यांची ग्रामपंचायत आहे. तहसिलदार शामला खोत-पाटील यांच्याकडे सदरचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. यावेळी गिरजवडेचे उपसरपंच माेहन मुळीक, सदस्य अजय पाटील, इंदूबाई सावंत, आत्माराम शेळके, स्वप्नाली नलवडे ,माजी उपसरपंच महादेव पाटील, नामदेव सावंत,आनंदा माेंडे,शरद पाटील,कृष्णा नलवडे उपस्थित हाेते.
0 Comments