शिराळा,ता.१२:शिराळा तालुक्यात रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार वळिवच्या पावसामुळे बिऊर येथील पाणी पुरवठा योजनेच्या पंपगृहाची दहा बाय दहाची खोली विहिरीसाठी ४० फूट खुदाई केलेल्या लगतच्या विहिरीत कोसळली तर पावलेवाडी येथील उताराला बस्थानक शेजारी शिराळा-कोकरूड हा मुख्य रस्ता खचला आहे.
.शिराळा तालुक्यात काल रविवारी शिराळा शहरासह तालुक्यातील अनेक गावात सायंकाळी चार ते साडे सहा पर्यंत विजांच्या कडकडाटासह जोरदार वळिवच्या पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी नाल्यात पाणी न बसल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले होते. वाकुर्डे, इंग्रूळ, रेड, खेड, बेलदारवाडी,एम.आय डी सी परिसर,बिऊर,उपवळे,तडवळे, कापरी,जांभळेवाडी,कोकरूड,बिळाशी,मांगरूळ,पावलेवाडी चरण, शेडगेवाडी,येळापूर परिसरात पावसाने झोडपून काढले होते.
विटा-पेठ-मलकापूर या मुख्य महामार्गांवर शिराळा-कोकरूड दरम्यान असणाऱ्या पावलेवाडी येथे मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली.त्यामुळे पावसाचे पाणी गटारीत न बसल्याने पाणी मुख्य रस्त्यावर आले.पावसाच्या पाण्याचा वेग व सतत असणारी वाहनांची वाहतून यामुळे पावलेवाडी येथील सुमारे २५ फूट अंतरावरील रस्ता खचला आहे.याबाबत तहसीलदार कार्यालया मार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाला सुचना दिल्या असून बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदार यांना रस्ता दुरुस्तीचे आदेश दिले आहेत.मात्र हा खचलेला रस्ता वाहनधारकांच्यासाठी धोकादायक आहे.
बिऊर (ता.शिराळा) येथे १५ व्या वित्त आयोगातून नवीन आर.सी.सी.विहीर बांधकाम करण्याचे काम सुरु आहे.त्या लगत बिऊर पाणी पुरवठा योजनेचे पंपगृह आहे.काल झालेल्या वळिवचा पावसामुळे सदर ठिकाणचा भरावा भुसभुशीत असल्याने तो खचून ४०फूट खोल विहीर खुदाई केलेल्या ठिकाणी साहित्यासह दहा बाय दहा चे विद्युत पंपगृह साहित्या घसरल्याने नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळी सरपंच स्वाती राजेंद्र पाटील,उपसरपंच प्रियांका प्रशांत पाटील,ग्रा.पं.सदस्य प्रदीप बाळासो पाटील,श्रीरंग पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र पाटील,प्रशांत पाटील, ग्रामपंचायत अधिकारी शुभांगी मस्के,पोलीस पाटील सीताराम पाटील,प्रदीप गोरख पाटील, उत्तम पाटील,उपस्थित होते.
विद्युत पंपगृह कोसळल्याने नळ पाणी पुरवठा योजनेवर परिणाम होणार आहे.लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही तात्पुरता सुरु करण्याचा प्रयत्न करत आहे.विहिरीत पाणी गढूळ आले असल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पाणी उखळून प्यावे.
शुभांगी मस्के (ग्रामविकास अधिकारी )
0 Comments