शिराळा,ता.१५:बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या साक्षीने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोयना व चांदोली या संरक्षित क्षेत्रातील जंगलात ८० मचाणावर बसून १२० जणांनी चांदण्या रात्री निसर्गप्रेमीं अभयारण्य वाचनाचा थरार सोमवारी (ता.१२)रात्री ते मंगळवारी (ता.१३)सकाळ पर्यंत अनुभवला.यावेळी निसर्ग प्रेमींना कोयना येथे एका वाघाची आणि एका बिबट्याची डरकाळी ऐकावयास मिळाली. ही डरकाळी ऐकून त्या परिसरातील अनेकांच्या जीवाचा थरकाप उडालाच पण त्याच क्षणी निसर्गाच्या सानिध्यात राहून ऐकलेल्या डरकाळीने त्यांचे कान तृप्त झाले.काही ठिकाणी बिबट्या प्रत्यक्षदर्शनी दिसला तर काही ठिकाणी पायाचे ठसे ,विष्ठा आढळून आली.
गणना झालेले प्राणी असे:
१) कोयना:वाघ(१)(डरकाळी),बिबट्या(१)(डरकाळी),गवे (२६),अस्वल(८),मुंगुस(२),साळींदर(३),खवलेमांजर(१),सांबर(१),रानडुक्कर(३५),भेकर(४),ससा(१),शेकरू(१) ,मोर(२),रानकोंबडे(९)
२)आंबा:बिबट्या(१),गवे (४५),अस्वल (१),मुंगुस(१),सांबर(४),रानडुक्कर(५),भेकर(१),माकड(७) ,ससे(३),शेकरू(६),वटवाघूळ(१),मोर(१),रानकोंबडे(२५), चकोत्री(३).
३)ढेबेवाडी:बिबटे(३),गवे(११),रानकुत्रे(५),उदमांजर(१),साळींदर (८),सांबर(७),रानडुक्कर(३६),भेकर(५),वानर(१), माकड(१),ससे(२),रानउंदीर(२),वटवाघूळ(४),मोर(२),रानकोंबडे (८).
४)चांदोली:गवे(१०३),उदमांजर(७),मुंगुस(६),सांबर(३),रानडुक्कर(२७),भेकर(६),वानर(४),माकड(१८),शेकरू(३), रानउंदीर(१),मोर(१०),रानकोंबडे(७५).
५)हेळवाक:गवे(१७),उदमांजर(१),सांबर(१०),ससे(३), शेकरू(५),खार(२),रानकोंबडे (१६ ).
६) पाटण:गवा(१),कोल्हा(१),मुंगुस(१)सांबर(१) ,रानडुक्कर(१) शेकरू(१),रानकोंबडे (५).
७)बामणोली:गवे(२६),अस्वल(२),सांबर(२),रानडुक्कर(२), वटवाघूळ(१),रानकोंबडे (२ ).
८) कांदाट:गवा (१)
गणनेतील एकूण प्राणी संख्या
वाघ (१),बिबटे (५),गवे (२३०),रानकुत्रे (५),कोल्हा (१),अस्वल(११),उदमांजर(९),मुंगुस(१०),साळींदर (११), खवलेमांजर(१),सांबर(२८),रानडुक्कर(१०६),भेकर(१६),वानर(५),माकड(२६),ससे(९) ,शेकरू(१६),खार(२) ,रानउंदीर (३),वटवाघूळ(६),मोर(१५) ,रानकोंबडे (१४० ),चकोत्री(३)
या ठिकाणी होते प्रगणक
आंबा (१४),चांदोली (२०),ढेबेवाडी (२४),हेळवाक(१२), कोयना(१६),पाटण (१२),बामणोली (१४),कांदाट (८)असे १२० प्रगनक होते.
असे होते गणना नियोजन
एकूण मचाण:८०
चांदोली वन्यजीव विभाग(४५)
कोयना वन्यजीव विभाग(३५)
0 Comments