BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ब्रिलियंट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे एमएच टी सीईटी मध्ये यश नामांकित इंजिनीयरिंग कॉलेज मध्ये प्रवेशासाठी सज

 



आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .



कराड : राज्य व राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांमध्ये सातत्याने उत्तम कामगिरी करणाऱ्या ब्रिलियंट अकॅडमी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कराड येथील विद्यार्थ्यांनी  एमएच टी सीईटी २०२५ परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे.

या वर्षी संस्थेचे विद्यार्थी तेजस चंद्रकांत दाभाडे (९९.९१),आर्यन मोहन पाटील (९९.९०), विशाखा परशुराम आरेकर (९९.५७),जयराज सुधाकर चव्हाण ९९.५०), सुमित चंद्रकांत यादव (९९.३७),अनुष्का दिलीप जठार (९९.७६) तसेच पार्थ विनोद जामदार (९८.५६) गौरव महेश भोसले (९८.२७), अंकलेश मलसिंग राजपुरोहित (९८), तृप्ती संभाजी कुंभार (९७.८३), अवधूत अनिल पाटील (९७.६०), अफीफा पटवेकर (९७.५०), तनिष्का गणेश जाधव (९७.३८) व्यंकटेश अरुण जाधव ( ९७.२३), अनुष्का सुरेश कुंभार (९७.१५) तनिष्का भास्करराव थोरात (९७.१४), अंतरिक्ष गणेश चव्हाण (९६.६०),रणजित भीमराव खराडे (९६),प्रेरणा प्रशांत भोसले (९६) या प्रमाणे पर्सेन्टाइल मिळवले आहेत ९० पर्सेन्टाइल पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे ६२ विद्यार्थी आहेत,

हे विद्यार्थी नामांकित इंजिनीयरिंग प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.ब्रिलियंट अकॅडमीने गेल्या १० वर्षांपासून इंजिनीयरिंग परीक्षेत यशस्वी निकाल देण्याची परंपरा जपली आहे.विशेष म्हणजे संस्थेच्या फक्त कराड येथील एकाच शाखेतील विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे.संस्थेचे सर्व शिक्षक गेल्या १० वर्षांपासून एकनिष्ठपणे कार्यरत असून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना आयआयटी,एनडीए,आयएमयू सीईटी,बिटसेंट,व्ही आयटी,आर्किटेक्चर व रिसर्च अशा विविध स्पर्धा परीक्षांत घवघवीत यश मिळवून दिले आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या संचालक मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास कृष्णा कोयना पतसंस्थेचे महाव्यवस्थापक अरुण पाटील, जागृती विद्यामंदिर बनवडीचे मुख्याध्यापक, कराड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, सुधाकर चव्हाण, कराड शहरातील नामवंत स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट अजित पाटील संस्थेचे अध्यक्ष आदित्य रंजन,संस्था सचिव मोहन पाटील,प्राचार्या रुपाली पाटील, केमेस्ट्री विभाग प्रमुख निलेश कुमार,गणित विभाग प्रमुख स्वप्नील अगरवाल,जीवशास्त्र विभाग प्रमुख निल शर्मा,अभिषेक रावत, पालक आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सध्या ११ वी १२ वी सायन्स (एनसीईआरटी पॅटर्न) चे नवीन बॅचेस सुरू झाले असून अभियांत्रिकी, मेडिकल, आर्किटेक्चर, डिफेन्स, रिसर्च या क्षेत्रांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ग उपयुक्त ठरणार आहेत. यासोबतच, स्कूल अंतर्गत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्यासाठी ६ वी ते १० वी फाउंडेशन कोर्सेस देखील सुरू करण्यात आले आहेत टेक्नोस्कुल प्रकल्पाअंतर्गत एमटीबीटी द्वारे संचालित कंप्युटर लँग्वेज कोडींग, आर्टिफिशियल इंटेलिजेंसी, रोबोटिक्स ई. चे अध्यापन सुरु करून विद्यार्थी टेक्नोसॅव्ही व्हावे म्हणून विशेष प्रयत्न सुरू आहेत.


संस्थेने "विद्यार्थी हित म्हणजेच ब्रिलियंट" हे ब्रीदवाक्य जपले असून कराड व परिसरातील पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभघ्यावा, असे आवाहन संस्थेच्या संचालक मंडळाने केले आहे.

Post a Comment

0 Comments