BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिवाजीराव नाईक यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार )पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

 



आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .


शिराळा,ता.२४:मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार  प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,प्रफुल्ल पटेल यांच्या सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत माजी राज्य मंत्री शिवाजीराव नाईक यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवडीचे पत्र नाईक यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे हस्ते देण्यात आले ,

   शिवाजीराव नाईक यांनी मागील दोन महिन्यापूर्वी मोजक्या कार्यकर्त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार(दादा),प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे प्रवेश केला.त्यांनी अजित दादाचे हात बळकर करण्याचा निर्णय घेतला.त्यांनी जवळपास १३वर्षे सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट केलेले काम,त्यानंतर पाच वर्षे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व त्यानंतर आमदार म्हणून केलेला राजकीय प्रवास हा वाखाण्याजोगा असल्यामुळे व प्रशासनामधील गाडा अभ्यास असल्याने त्यांना आज  राज्यामध्ये काम करण्याचे संधी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली असल्यामुळे शिराळा मतदारसंघांमध्ये व संपूर्ण सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

        यावेळी आमदार शिवाजीराव गर्जे,राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील,माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख,सांगली शहर राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रा.पदमाकर जगदाळे,सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर दिग्विजय सुर्यवंशी,रणधीर नाईक,केदार पाटील,शिराळा तालुका अध्यक्ष अशोक पाटील, शहाजी पाटील,सी,एच.पाटील,विठ्ठल दळवी,सांगली जिल्ह्यातील जत,पलूस,कडेगाव,मिरज,सांगली शहर यासह विविध तालुक्यातील अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.    

      निवड झाल्यानंतर शिराळा मतदार संघातील गावा गावामध्ये व शिराळा शहरांमध्ये गुलालाची उधळन करत पेढे वाटून फटाक्याची आतश बाजी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी करून आनंद उत्सव साजरा केला.

Post a Comment

0 Comments