शिराळा:शिराळकरांची अस्मिता असणाऱ्या जगप्रसिद्ध नागपंचमीला २००१ पूर्वीचे गत वैभव मिळवून देण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न सुरु असून त्यास नक्कीच यश मिळेल असे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले.
शिराळा येथे भाजपच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी सम्राट महाडिक यांची निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार प्रसंगी बोलत होते. यावेळी सी.बी.पाटील,संपतराव देशमुख, सुखदेव पाटील,के.डी.पाटील,रणजितसिंह नाईक,जयसिंगराव शिंदे,सम्राट शिंदे,माजी नगरसेवक केदार नलवडे ,अनिताताई धस,विद्याताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार सत्यजित देशमुख म्हणाले,शिराळा तालुक्याच्या पर्यटनाचे वैभव ठरणाऱ्या शिराळा येथील भुईकोट किल्ला येथे भव्य दिव्या स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी आपण प्रयत्नशील असून केंद्रीय मंत्री जोतिरादित्या शिंदे यांनी ही पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले असल्याने हा प्रश्न लवकरच मार्गी लागून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल.आगामी जिल्हापरिषद,पंचायत समिती,नगर पंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण केलेली व पक्षाच्या माध्यमातून झालेली विकास कामे घरात घरात पोहचवून जन जागृती करा.आपणाला या निवडणुकीत कसल्याही परिस्थितीत भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. कारण आपण केलेली विकासात्मक कामे घेऊन लोकांच्या पर्यंत गेलो तर कामाच्या माणसाला लोकं नाकारत नाहीत..त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने बाहेर पडून कामाला लागा यश आपलेच आहे.
जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक म्हणाले,आगामी निवडणूकीत युती करायची की स्वबळावर लढायचं हा वरिष्ठ पातळीवरील निर्णय आहे.मात्र आपण निर्णय काही ही झाला तरी तयारीत राहायचं आहे.त्यामुळे कार्यकर्त्यानी गाफिल राहू नये.भाजप बोलत नाही तर करून दाखवते.माझ्या सारख्या कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष करून मला मोठी संधी दिली आहे.त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही.त्यांनी ज्या विश्वासाने माझ्यावर जबाबदारी सोपावली.त्याचं विश्वासाने व जोमाने तुमच्या सर्वांच्या पाठबळावर काम करत राहणार आहे.
स्वागत व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सत्यजित पाटील यांनी केले.यावेळी जयराज पाटील,पै.अशोक पाटील,अनिल देशमुख,आनंदराव पाटील,कुलदीप निकम,बाजीराव शेडगे,सर्जेराव पाटील,वैभवी कुलकर्णी,रुपाली भोसले,अनिता माने,सुदाम पाटील,तानाजी कुंभार,भीमराव पाटील,वीरेंद्र पाटील,धनाजी नरुटे उपस्थित होते.आभार संभाजी नलवडे यांनी मानले.
0 Comments