शिराळा,ता.२७ :राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची निवड झाल्याने त्यांचे सांगली जिल्ह्यामध्ये भर पावसात मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले. निवडीनंतर प्रथमच शिवाजीराव नाईक यांनी गुरुवारी सायंकाळी सांगली जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असताना प्रथम कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन केले. शाहू महाराज यांना ही अभिवादन केले. त्यानंतर कासेगाव येथे क्रेनच्या साह्याने हार घालून प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये जल्लोषी स्वागत करण्यात आले. नेर्ले,पेठ नका येथे वाळवा तालुक्याच्या वतीने फटाक्याची आतषबाजी करत स्वागत केले. शिराळा तालुक्याच्यावतीने बाह्यवळण रस्ता व गोरक्षनाथ शासकीय प्रशिक्षण संस्था येथून ओपन जीप मधून ,ढोल, हालगी, ताशाच्या व सवाद्याच्या गजरात व फटाके, फुलांची उधळण करत मोटरसायकल रॅली काढून भव्य असे स्वागत करण्यात आले.या मिरवणुकीची सांगता अंबामाता मंदिराजवळ करण्यात आली.
यावेळी अंबामाता मंदिरात झालेल्या कार्यक्रमात प्रदेश उपाध्यक्ष नाईक म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर राज्यस्तरावर काम करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. यामुळे पुढील काळात शिराळा विधानसभा मतदारसंघातील जनतेची जबाबदारी वाढली आहे. आपण सर्वांनी हातात हात घालून अजित दादांचे हात बळकट करण्यासाठी व पक्ष संघटनेचे जिद्दीने काम करायचे आहे. पक्षाच्या जे काही धोरण असेल किंवा ते आदेश देतील त्या पद्धतीने काम करायचे आहे. उत्साह वाढवण्याचे काम केले आहे.
रणधीर नाईक म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची निवड करून सांगली जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात वेगळा संदेश दिला आहे. या पदाचा उपयोग करून यापुढील काळात सर्वांना बरोबर घेऊन पक्ष बळकटीची काम करू .
यावेळी सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील, वाळवा तालुका अध्यक्ष केदार पाटील, निलेश येसुगडे,जिल्हा परिषदचे माजी सदस्य रणधीर नाईक, सत्यजित नाईक राष्ट्रवादी जिल्हा युवा अध्यक्ष चंद्रकांत पाटील,तालुकाध्यक्ष अशोक पाटील,वारणा कारखान्याची संचालक विजय पाटील शिवाजी केन संचालक उत्तम निकम, शिराळा माजी नगरसेवक उत्तम डांगे, सचिन यादव,ॲड नेहा सूर्यवंशी,सीमा कदम,राजश्री यादव, प्रा.भीमराव गराडे,राजन पाटील, सुरेश पाटील, वैभव कांबळे, ॲड.नरेंद्र सूर्यवंशी, आनंदराव पाटील, प्रकाश पाटील, ॲड. संजय नाईक, शहाजीराव नाईक,संभाजीराव नाईक ,वाळवातील तालुक्यातील प्रमुख संस्थांचे पदाधिकारी,सरपंच व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments