शिराळा,ता.३०:भाटशिरगाव ग्रामपंचायतीला बेकायदेशीररित्या टाळे ठोकून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यावर ग्रामपंचायत अधिकारी सचिन मोरे यांनी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी भाटशिरगाव ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी शिराळा पंचायत समिती कार्यालयासमोर भर पावसात बेमुदत आंदोलन सुरू केले.
१६ जून रोजी गावातील काही लोकांनी कोणतीही पूर्वसूचना न देता ग्रामपंचायत अधिकारी,कर्मचारी यांना कार्यालयातून जबरदस्तीने बाहेर काढून कार्यालयास टाळे ठोकले होते.या बाबत गुन्हा दाखल न केल्यास कोणत्याही परिस्थितीत बेमुदत ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याचे ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले.यावेळी लोकनियुक्त सरपंच भगवान भंडारे,उपसरपंच संजय देसाई,सदस्या कमल देसाई, वैशाली आलुगडे,युवक क्रांतीचे समन्वयक कैलास देसाई यांनी आपली बाजू मांडली.
आंदोलनास पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलीस उपनिरीक्षक राहुल अतिग्रे,विनोद पाटील,स्वप्निल दमामे,तालुका विस्तार अधिकारी मनोज जाधव यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली.
माजी पंचायत समिती सदस्य रणजितसिंह नाईक,सुनंदा दूधचे संचालक सागर पाटील,महेश पाटील,भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सम्राट शिंदे,सागर नाईक,९६ कुळी मराठा संघटनेचे अध्यक्ष अनिल घोडे-पाटील,बसवेश्वर शेटे,शिवाजी केनचे संचालक उत्तम निकम,भाजपाचे शिराळा शहराध्यक्ष कुलदीप निकम,अतुल पाटील,स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष राम पाटील,तालुकाध्यक्ष मानसिंग पाटील,शिवाजी पाटील,राष्ट्रीय बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष दयानंद शिवजातक,प्रहारचे तालुकाप्रमुख श्रीराम नांगरे-पाटील,वाकुर्डे बुद्रुकचे सरपंच आनंदा कुंभार,उपसरपंच अशोक माने,सदस्य राहुल गायकवाड,करमाळेचे सरपंच सचिन पाटील,राजेंद्र पाटील,शिवाजी खोत,ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील,नाटोली सरपंच तानाजी पाटील यांनी आंदोलनास भेट देऊन पाठिंबा दिला.
याप्रसंगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सर्जेराव देसाई,तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष भिमराव देसाई,बाबुराव देसाई,सेवा सोसायटीचे संचालक दत्तात्रय पाडळकर,अजित देसाई,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल आलुगडे,बाजीराव देसाई, कुंडलिक देसाई,सागर देसाई,माजी सैनिक संजय देसाई,सुरेश भंडारे,कुंडलिक मोरे,महादेव देसाई,विश्वास देसाई,दिलीप गुरव व ग्रामस्थ,महिला उपस्थित होते.
0 Comments