शिराळा,ता.३०:आज शिराळा तालुक्यासह चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे.२४ तासात चांदोली येथे ५९ मी.मी.तर ८ तासात ३१ मी.मी तर आज अखेर १०८० मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. सायंकाळी चार वाजता धरणात २४.२७ टी.एम.सी पाणीसाठा झाला आहे. धरणात ३१५.५० मीटर पाणी पातळी तर पाणीसाठा ६८७.१७३ द.ल.घ.मी झाला आहे.तालुक्यातील ४९ तलावा पैकी ४७ ;तलाव जून महिन्यात १०० टक्के भरले आहेत.त्यामुळे तलावांचे पाणी सांडव्यातून बाहेर पडत असल्याने ओढ्या नाल्यांच्या पाणी पातळीतवाढ होऊ लागली आहे.
गत वर्षी ११.५१टीएमसी पाणीसाठा होता .आता यावर्षी २४.०१ टीएमसी पाणीसाठा झाल्याने गत वर्षाच्या तुलनेत १२ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.धरणात पाण्याची आवक ९१०५ क्युसेसने सुरु आहे.असून वारणा जलविद्युत प्रकल्पातून १६९० कुसेस ने विसर्ग सुरु आहे. गत वर्षी जून महिन्यात आज अखेर ५०५ मी.मी. पाऊस झाला होता.यावर्षी १०४९ मी.मी.पाऊस झाल्याने गत वर्षाच्या तुलनेत या वर्षी ५४४ मी.मी.पाऊस जास्त झाला आहे.शिराळा तालुक्यातील कोकरूड व शाहुवाडी तालुक्यातील रेठरे दरम्यानचा वारणा नदीवरील बंधारा ११ दिवसापासून पाण्याखाली असल्याने दोन्ही तालुक्यातील काही गावांचा जवळचा संपर्क तुटला आहे.शिराळा येथील मोरणा धरण व वाकुर्डे बुद्रुक(करमजाई),अंत्री बुद्रुक(मानकरवाडी),शिवणी,टाकवे ,रेठरे धरण येथील तलाव असे एकूण पाच तलावात पूर्ण क्षमतेने भरले असून कार्वे तलाव भरणे बाकी आहे.
जून महिन्यात ४७ तलाव १०० टक्के भरले
कोंडाईवाडी,इंगरूळ,भैरववाडी,निगडी (खोखड दरा),शिरशी (कासारकी),करमाळे,तडवळे वाडदरा,,हत्तेगाव (आंबाई वाडा),भाटशिरगाव,शिरशी (काळे खिंड), शिरशी नंबर १,सावंतवाडी, शिवरवाडी,प.त.शिराळा नंबर २,चरणवाडी नंबर १,धामवडे(कुंड नाला),शिरशी (भैरवदरा),अंत्री खुर्द,बेलदारवाडी,कोंडाई वाडी नंबर २,गवळेवाडी(बहिर खोरा),रेड नंबर २,शिरसटवाडी,गवळेवाडी (उंदीर खोरा),चव्हाणवाडी (येळापूर),निगडी (कासारकी),औंढी,लादेवाडी,मेणी (साकृंबी नाला),पावलेवाडी नंबर २,पाडळी,तडवळे नंबर २,निगडी (महारदरा जुना),वाकुर्डे बुद्रुक (बादेवाडी),पाडळेवाडी,पावले वाडी नंबर १,वाकुर्डे खुर्द,बिऊर,आटूगडेवाडी (मेणी), वाकुर्डे बुद्रुक (जामदाड),कापरी,प.त.शिराळा नंबर १,खिरवडे, वाडीभागाई,हत्तेगाव(अशीलकुंड)खेड,भटवाडी या तलावात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे.करमाळे व पाचुंब्री या तलावांचे साठवण तलावात रुपांतर करण्याचे काम सुरु असल्याने त्यात २० ते ५५ टक्के पाणीसाठा आहे.
करमाळे गावच्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी तलावातून पाईपलाईन द्वारे तलावातील पाणी विहिरीत घेतले असल्यामुळे,सध्या करमाळे तलावात अंदाजे २० ते ते २५ टक्के पाणीसाठा आहे.या तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्याचे काम मृद व जलसंधारण विभागामार्फत सुरु आहे. पाचुंब्री तलावामध्ये सध्या ५० ते ५५ टक्के पाणीसाठा आहे.या तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे शिराळा तालुक्यातील एकूण ४९ पाझर तलावा पैकी ४७ पाझर तलाव पूर्ण क्षमतेने म्हणजे शंभर टक्के भरले आहेत.
प्रविण तेली (उपविभागी जलसंधारण अधिकारी, शिराळा)
मंडलनिहाय पडलेला पाऊस कंसात एकूण पाऊस मिली मीटर मध्ये असा...
कोकरूड २०.३ (५३७.५)
शिराळा - (२४६.४ )
शिरशी ३२.३ (४२२.८ )
मांगले -८.३(२७२ .३ )
सागाव - ८.५ (२९१.५ )
चरण ६६.५ (८६७.१ )
वारणावती ५९ (१०४९ )
0 Comments