शिराळा,ता.२८ :शैक्षणिक प्रबोधनासाठी २१ शिराळकरांना जीवंत नाग पकडण्याची मिळालेली परवानगी ही शिक्षण,रूढी परंपरा जातन करणारी व शैक्षणिक व धार्मिक प्रबोधनाची लोक चळवळ जगातीक दर्जाचे व्यासपीठ व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असे आवाहन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले.
पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय, वन्यजीव विभाग नवी दिल्ली यांचेकडून Deputy Inspector General of Forests (WL) यांचेकडील २७/०७/२०२५ रोजीच्या पत्रान्वये २१ अर्जदारांना नाग पकडणेसाठी २७ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत अटी शर्तीस अधिन राहून परवानगी देणेत आलेली आहे.त्या पार्श्वभूमीवर शिराळा येथे भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी आमदार देशमुख म्हणाले, हा ऐतिहासिक निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.लोकशिक्षणाची भावना लुप्त पावली होती.ती परंपरा पुन्हा या निमित्ताने सुरु होण्यासाठी सर्वांनी सातत्याने पाठ पुरावा केला.त्यास यश आले आहे. त्यासाठी अनेकवेळा आंदोलने झाली.निवेदने दिली. मोठा संघर्ष केला.त्यामुळे शिराळकरांचे २३ वर्षाचे स्वप्न साकार झाले आहे. हा लोक प्रतिनिधींच्या चळवळीच्या माध्यमातून हा धाडशी निर्णय झाला आहे. हीच लोक चळवळ पुनरस्थापित झाली आहे.शिराळा येथे विधानसभा निवडणुकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेला शब्द पळाला आहे.ज्यांना प्रबोधनासाठी अटीव शर्तीवर जिवंत नाग पकडण्याची परवानगी मिळालेल्या पासधारकांना सहकार्य करावे.प्रशासनाशी आपले आपुलकीचे नाते आहे. ते कायम टिकवा.
२१ शिराळा ग्रामस्थांना जिवंत नाग पकडण्यासाठी मिळालेली हा शिराळकरांच्या दृष्टीने एक पहिले महत्वाचे पाऊल आहे.जागतिकदर्जाचे धार्मिक पर्यटनाचे स्थळ म्हणून नावारूपास येईल यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया. सन २००२ पासून ही नागपंचमी न्यायालयाच्या बंधनात अडकली होती.मात्र गृहमंत्री अमित शहा, पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,वनमंत्री गणेश नाईक,खासदार धैर्यशील माने,आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह इतरांच्या सामुहिक प्रयत्नामुळे आपणाला ही परवानगी मिळाली आहे.नागरिकांनी संयम बाळगावा. प्रशासनास सर्वांनी सहकार्य करावे. विधानसभा निवडणुकीत नागपंचमीचा प्रश्न ऐरणीवर होता.त्यावेळी गृहमंत्री शहा यांनी यावेळी शब्द दिला होता तो शब्द खरा केला आहे. आता आपण अटी व शर्ती यांना अधीन राहून नागाबाबत प्रबोधन करावे. अबालवृद्ध, महिला , नागरिक यांची आता मागणी पूर्ण झाली आहे.नागपंचमी पारंपरिक पद्धतीने सुरू व्हावी यासाठी पाठपुरावा केला होता आता जागतिक धार्मिक पर्यटनाचे स्थळ म्हणून नावारूपास येईल यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया.
यावेळी संपतराव देशमुख, हणमंतराव पाटील,रणजितसिंह नाईक,सम्राट शिंदे,अभिजित नाईक, पृथ्वीसिंह नाईक, विश्वप्रतापसिंह नाईक, संतोष इंगवले,संभाजीराव नलवडे,सत्यजित पाटील,कुलदीप निकम,उपस्थित होते.
सायंकाळी पाच वाजता शैक्षणिक प्रबोधनासाठी २१ जणांना नाग पकडण्याची परवानगी मिळाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने शिराळकारनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून एकाच जल्लोष केला.शिराळा येथे आमदार सत्यजित देशमुख यांचे जल्लोषी स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला.
0 Comments