शिराळा,ता.२८: शिराळा येथील २१ ग्रामस्थांनी अभ्यास ,शिक्षण प्रसारासाठी यासाठी नाग पकडण्याची मागणी केली होती.त्यानुसार नुसार पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय, वन्यजीव विभाग नवी दिल्ली यांचेकडून Deputy Inspector General of Forests (WL) यांचेकडील दिनांक २७/०७/२०२५ रोजीचे पत्रान्वये त्यांना नाग पकडणेसाठी २७ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत अटी शर्तीस अधिन राहून परवानगी देण्यात आली आहे. तसे पत्र ग्रामस्थांना मुख्य वन्यजीव वॉर्डन आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूरचे च्या एम. श्रीनिवास राव यांनी दिले आहे.त्यामुळे शिराळा येथे जल्लोषी वातावरण आहे.
या पत्रात म्हटले आहे, शिराळा वनक्षेत्रातील २१ ग्रामस्थांनी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील नियम क्र. १२ अन्वये विशेष उद्देशामधील अभ्यास / शिक्षण करणेकामी नाग पकडणेसाठी मंजूरीबाबत परवानगी मागणी केलेली होती. त्यानुसार पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय, वन्यजीव विभाग नवी दिल्ली यांचेकडून Deputy Inspector General of Forests (WL) यांचेकडील दिनांक २७/०७/२०२५ रोजीचे पत्रान्वये २१ अर्जदारांना नाग पकडणेसाठी २७ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत अटी शर्तीस अधिन राहून परवानगी देणेत आलेली आहे. ही परवानगी ही केवळ शैक्षणिक उद्देशासाठीच व स्थानिक लोकांमध्ये, समाजामध्ये सर्प संवर्धनाविषयी पारंपारीक ज्ञान प्रसारण होणेकामी अनुमती देणेत आलेली आहे.
ह्या आहेत अटीआणि शर्थी
कोणतीही व्यावसायीक किंवा मनोरंजन, स्पर्धा, मिरवणूक, खेळ, याला परवानगी नाही. ज्या अर्जदारांना परवानगी मिळालेली आहे त्यांनी नाग पकडताना मुख्य वन्यजीव संरक्षक किंवा त्यांचेकडून अधिकृत केलेल्या अधिका-यामार्फतच व वन व वन्यजीव अधिका-यांच्या उपस्थितीत करणेबाबत बंधन करक आहे. यामध्ये नागांचा एकही मृत्यू होणार नाही व नाग सुरक्षितपणे मूळ अधिवासात सोडणेबाबत सूचना करणेत आलेल्या आहेत.या २१ अर्जदारांव्यतिरिक्त कोणीही नाग पकडल्यास, स्पर्धा, मिरवणूक, खेळ, केल्याचे आढळून आल्यास त्यावर वन्यजीव अधिनियम, १९७२ नुसार गुन्हा नोंद करणेत येईल.
शैक्षणिक उद्देशासाठीच व स्थानिक लोकांमध्ये, समाजामध्ये सर्प संवर्धनाविषयी पारंपारीक ज्ञान प्रसारण करण्यासाठी २१ शिराळा ग्रामस्थांना जिवंत नाग पकडण्यासाठी मिळालेली परवनागी ही शिराळकरांच्या दृष्टीने एक पहिले महत्वाचे पाऊल आहे.जागतिकदर्जाचे धार्मिक पर्यटनाचे स्थळ म्हणून नावारूपास येईल यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया.
आमदार सत्यजित देशमुख
शिराळा येथील २१ ग्रामस्थांनी अभ्यास ,शिक्षण प्रसारासाठी यासाठी नाग पकडण्याची मागणी केली होती.त्यानुसार पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय, वन्यजीव विभाग नवी दिल्ली यांचेकडून Deputy Inspector General of Forests (WL) यांचेकडील २७/०७/२०२५ रोजीचे पत्रान्वये त्यांना नाग पकडणेसाठी २७ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत अटी शर्तीस अधिन राहून त्यांना परवानगी देण्यात आली आहे.
एकनाथ पारधी वन क्षेत्रपाल शिराळा
0 Comments