शिराळा,ता.२२८ : मंगळवारी शिराळा येथे मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या जगप्रसिद्ध नागपंचमीसाठी शिराळा नागरी सज्ज झाली आहे.हा उत्सव शांतते पार पाडण्यासाठी शिराळा शहरात २० सिसिटीव्ही कॅमेरे, ४ वॉच टॉवर, २० व्हिडिओ कॅमेरे यांच्यासह पोलीस व वन भागाचे सातशेहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. १ पोलीस उपअधीक्षक,पोलीस निरीक्षक १०,सह्यायक पोलीस उपनिरीक्षक ३८,पोलीस कर्मचारी ३४२, महिला पोलीस अंमलदार ५०, वाहतूक पोलीस ४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॅमेरामन ११, ध्वनी मापक यंत्र १९, ड्रोन कॅमेरे २, अंबामता मंदिर परिसर ,मिरवणूक मार्गवर २० सिसिटीव्ही कॅमेरे, वाच टॉवर ४, व्हिडिओ कॅमेरे २०, एक बॉम्ब शोधक पथक , दोन दंगल विरोधी पथक, ४०वॉकी टॉकी सेट आहे. उपवनसंरक्षक १, विभागीय वन अधिकारी १, सहाय्यक वन संरक्षक ६, वनक्षेत्रपाल २०, वनपाल २०, वनरक्षक ३८, वनमजूर ५४, पोलिस कर्मचारी १०,दहा गस्ती पथकासाठी वनक्षेत्रपाल ४, वनरक्षक ४,वनमजूर ४, पोलिस कर्मचारी ४, छायाचित्रकार ४, सर्पमित्र ४ ,तपासणी नाके ७,बत्तीस गल्ल्यासाठी सहा पथके, ड्रोन कॅमेरे, सी.सी.टी.व्ही कॅमेरे तसेच सोशल मीडियावर तयार करण्यात येणाऱ्या गतीविधीवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षाची नेमणूक करण्यात आली आहे.
एसटी बसस्थानक,नगरपंचायत , व्यापारी हॉल,पाडळी नाका, शनिमंदिर, समाज मंदिर, नायकुडपुरा या सात ठिकाणी रुग्णवाहिकेसह आरोग्य पथके ठेवण्यात आली आहेत. शहरात ५२ आरोग्य सर्वेक्षण पथका मार्फत पाणी ,हॉटेल, खाद्यपदार्थ स्टॉलची तपासणी केली आहे. शिराळा -इस्लामपूर, शिराळा-कोकरूड, शिराळा-बांबवडे, शिराळा -कोडोली या मार्गावर भाविकांच्यासाठी आगारातील ३८ व इतर आगारातील २० जादा बसेस ठेवण्यात आल्या आहेत.
मिरवणूक मार्गावर प्रत्येक चौकात विद्युत कर्मचारी व अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.ग्रामदेवता आंबामाता मंदिर परिसरात भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.अंबामाता मंदिर परिसरात मिठाई, खेळणी, हॉटेल,स्वेटर विक्रेते दुकाने सुरु झाली आहे.मनोरंजनासाठी पाळणे, मिनी ऐसेल वर्ड यांची उभारणी मंदिर परिसरात केली आहे. शहरात भव्य स्वागत कमानी,नागराज मंडळाचे फलक विविध नेते व युवक कार्यकर्त्यांचे कटाउट येणाऱ्या लोकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे.त्यामुळे शिराळा नगरी डिजिटल व नाग मंडळांच्या फलकांनी सजले आहे.
0 Comments