BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

२३ वर्षाने झाले जिवंत नागाचे दर्शन

 


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .








शिराळा,ता.२९ :पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय, वन्यजीव विभाग नवी दिल्ली यांचेकडून २१ नागरिकांना शैक्षणिक उद्देशासाठीच व स्थानिक लोकांमध्ये, समाजामध्ये सर्प संवर्धनाविषयी पारंपारीक ज्ञान प्रसारण करण्यासाठी जीवंत नाग पकडण्याची  परवानगी मिळाळी .त्या  अटी व  शर्तीच्या  अधिन राहून शिराळा येथे  नागपंचमीच्या मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी वन कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली जीवंत नाग  दाखवून प्रबोधन केले.त्यामुळे येणाऱ्या भाविकांना २३ वर्षा नंतर पुन्हा एकवेळा नाग दर्शन  झाले आहे.मात्र घरोघरी महिलांनी  प्रतीकात्मक मातीच्या नागाची पूजा करून नागपंचमी साजरी केली.हा नागपंचमी उत्सव शिराळ्यात मोठ्या जल्लोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत  अंगावर पावसाच्या सरी झेलत संपन्न झाला.   मात्र मिरवणुकीत वाद्याचा दणदणात टिपेला पोहचला होता.

गेली २३ वर्षे जिवंत नागपूजेवर बंदी असल्याने शिराळा येथे येणाऱ्या भाविकांना प्रतीकात्मक नाग पाहून समाधान मानावे लागत होते.मात्र या वर्षी प्रबोधनाच्या माध्यामतून नागाचे दर्शन घेता आले.सकाळ पासून अंबामाता मंदिरात नागमंडळ व भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.दहा वाजता महाजन यांच्या घरी मानाच्या पालखीची विधीवत पूजन करण्यात आली.त्यानंतर पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीस सुरवात झाली.

दरम्यान आमदार सत्यजित देशमुख,सांगली जिल्हा भाजप अध्यक्ष सम्राट महाडीक माजी जिल्हापरिषद सदस्य रणधीर नाईक,रणजितसिंह नाईक,अनुसूचित जाती जमातीचे तालुकाध्यक्ष संतोष इंगवले,डॉ.अभिजित काळे,माजी ग्रामपंचायत सदस्य अजय जाधव,विश्वासचे संचालक विश्वास कदम, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्य समित कदम,पै.चंद्रहार पाटील ,उमेश कुलकर्णी,सचिन शेटे ,आपला बझार समुहाच्या अध्यक्षा सुनितादेवी नाईक,विजय पाटील,हणमंतराव पाटील,सुजित देशमुख,भिमराव पाटील यांनी मानाच्या पालखीचे दर्शन घेतले.दुपार पासून नाग मंडळांनी प्रतीकात्मक नागाची प्रतिमा गाड्यावर ठेवून मिरवणूक काढली. यावेळी प्रांतधिकारी श्रीनिवास अर्जुन,तहसीलदार शामला खोत-पाटील, विभागीय वनाधिकारी दक्षता पथक संजय वाघमोडे, सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे,सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जगताप ,वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी,पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी भेट देऊन पाहणी केली.विविध राजकीय पक्षांच्यावतीने नाग मंडळाचा सत्कार करण्यात आला.

युवकांचे आकर्षण  

 शिवसेना तालुकाध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक यांच्या कै.वसंतराव नाईक बाबानागराज मंडळाने आणलेल्या रिल स्टार अभिनेता सुरज चव्हाण   व संजयगांधी योजनेचे तालुकाध्यक्ष ,माजी नगरसेवक केदार नलवडे यांच्या कच्याड युवा शक्तीने मिरवणुकीत आणलेल्या संगमनेर  येथील कलाकारांच्या  नाथपंथीय अघोरी नृत्य व  सिने अभिनेत्री प्रियांका राऊत यांच्या उपस्थितीने  युवकांची  गर्दी खेचली.




 

 

Post a Comment

0 Comments