शिराळा,ता.२८:गिरजवडे पैकी मोंडेवाडी (ता.शिराळा) येथील संगीता मोहन मोंडे यांच्या घागरेवाडी येथील पाझर तलावाचा म्हैशीचा तुटलेल्या विद्युत तारेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला.ही घटना रविवारी दुपारी घागरेवाडी येथील पाझर तलाव येथे घडली.
याबबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी,काल रविवारी संगीता मोहन मोंडे ह्या आपली जनावरे घेवून दुपारी २ च्या सुमारास शेतामध्ये चाराय नेत होत्या.दरम्यान घागरेवाडी येथील पाझर तलाव येथील विजेच्या खांबावरील तार तुटून रस्त्यावर असणाऱ्या ओढयावर पडली होती. त्या ओढ्याच्या पत्रातून वाट असल्याने पाण्यात तार पडल्याने दिसून येत नव्हती.त्या ओढयातून जात असताना सुरवातीला असणऱ्या म्हैशीचा त्या विजेचा तारेवर पाय पडल्याने तिला विजेचा धक्का बसल्याने ती जागेवरच कोसळली.त्यामुळे पाठीमागे असणारी एक म्हैस व दोन लहान रेड्या बुजून पाठीमागे पळाल्या. संगीता यांच्या डोळ्यासमोर पोटच्या मुला प्रमाणे सांभाळलेल्या म्हैशीचा मृत्यू झाल्याने त्यांनी त्या ठिकाणी टाहो फोडला .त्यांनी जवळ जाऊन पहिले असता विद्युत तार तुटलेली दिसली.
ही माहिती मोंडेवाडीतील ग्रामस्थांना कळताच त्यांनी तात्काळ वायरमन उद्धव ओंडकर यांच्याशी संपर्क करून माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.टाकवे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.किरण शिसाळ यांनी शवविच्छेदन केले.यावेळी आनंदा मोंडे,पांडुरंग मोंडे,आप्पासो मोंडे,साहिल मोंडे, रघुनाथ मोंडे, संतोष घागरे,अशोक घागरे, पोलीस पाटील मोहन घागरे,घागरेवाडीचे सरपंच विक्रम खोचरे,शहाजी घागरे उपस्थित होते. चौकट-जगण्याचा आधार गेला .
संगीता आणि सावित्री ह्या दोघी सवती.चार वर्षापूर्वी अर्धांगवायुने पतीचे निधन झाले. पोटी विजय वय (१८)व दीपक (१६) ही दोन मुल.पण नियतीने त्यांच्या ही जीवनात मूक बधिरता दिली आहे. आलेले दु:ख पचवत संसाराचा गाडा सुरु होता. २० गुंठ्याच्याआत जमीन .त्यामुळे त्या दोघी सवतीवर कुटुंबाचा भार असल्याने रोजंदारीवर व दोन म्हैशीवर उदरनिर्वाह सुरु आहे. मात्र दोन पैकी एका म्हैशीचा मृत्यू झाल्याने या कुटुंबाचा जगण्याचा आधार गेला आहे.त्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी दानशूर व्यक्तींनी व विविध मंडळांनी मदतीचा हात देणे गरजेचे आहे.
0 Comments