शिराळा ,ता.२:जगप्रसिद्ध असणाऱ्या शिराळा नागपंचमीस जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळावी. यासाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकारने भूमिका मांडावी अशी लक्षवेधी आमदार सत्यजित देशमुख यांनी पावसाळी अधिवेशनात मांडली.याबाबत वन मंत्री गणेश नाईक यांनी नागपंचमी बाबत केंद्र सरकारकडे सकारात्मक भूमिका मांडून त्यांच्या मार्फत सर्वोच्च न्यायालय श्रद्धेला तडा जाणार नाही व प्राण्यांना इजा होणार नाही अशी भूमिका पडण्यास सांगून शिराळाकरांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.
ही लक्षवेधी मांडताना सत्यजित देशमुख म्हणाले,नागपंचमी हा सण परंपरागत अनेक वर्षापासून साजरा केला जात होता.सन २००२ ला एक सहनियंत्रण समिती नेमली.त्यानंतर जिवंत नागाची पूजा करण्यावर बंदी आली. त्यामुळे मातीचा नाग किंवा नागाची प्रतिमा पूजन करून शिराळकर ही नागपंचमी साजरी करतात. सन २०१४ साली मोदी सरकार आल्यानंतर हिंदू धार्मिक रूढी, परंपरा जपणारे सण घटनेचे अधिकार ठेवून साजरी करण्यात येतात का याकरिता सुब्रमण्यन समिती नेमली .या समितीने बैलगाडी शर्यत व तामिळनाडू राज्यातील जल्ली कटू निर्बंध उठवले आहेत.२०२२ ला १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा झाली .त्यामध्ये हत्तीच्या वापर समारंभास करण्या बाबत परवानगी मिळाली.नागपंचमीस जिवंत नागाची पूजा करता यावी अशी शिराळा मतदारसंघातील व शिराळकरांची उत्कंठ भावना आहे. महाराष्ट्राच्या गॅझेट मध्ये त्याची नोंद आहे. मराठी बालभारतीच्या तिसरीच्या पुस्तकामध्ये याची नोंद आहे.त्याचबरोबर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नागपंचमीच्या सोहळ्याची प्रतिकृती दिल्लीच्या तक्ता वरती दाखवली गेली आहे. लोकांच्या भावनेचा आदर करून सांस्कृतिक व धार्मिक कारणाने नागपंचमी अंतर्भूत करणे गरजेचे आहे.अंशदायिक कारणास्तव प्रावधान कायद्यामध्ये आहे.हत्तीच्या संदर्भात एक संधोधन केंद्र आहे.त्या प्रमाणे सरकारने कलम ११ व १२ अन्वये वैज्ञानिक व संशोधकीय कारणासाठी नाग व अन्य वन्यजीवांना हाताळण्यासाठी एक प्रावधान आहे. त्यामध्ये सांस्कृतिक आणि धर्मिक कारणासाठी त्यांचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे. वन्यजीव हाताळण्याचे प्रावधान यामध्ये आहे. त्या दृष्टीने १९७२ च्या कायद्यामध्ये संशोधन आणण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुराव करून जिवंत नागाची पूजा करून नागपंचमी साजरी करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी सरकारने पाठपुरावा करावा..
आमदार सत्यजित देशमुख यांनी शिराळा नागपंचमी बाबत भाऊक व भावनिक विषय मांडला आहे. या बाबत दिल्लीत ७ अथवा ८ जुलैला बैठक होणार आहे. नाग पूजा हा एक श्रद्धेचा भाग आहे.त्यामुळे केंद्रीय वन मंत्री यांच्याशी चर्चा करून व कायद्याच्या अनुशंगाने ही बाब सर्वोच्च न्यायालयाला पटवून देऊन यासाठी तज्ज्ञ आणि विधीज्ञ लोकांशी चर्चा करून शिराळकरांची असणारी भावना पूर्ण करण्याचा पर्यंत करू .
गणेश नाईक (वनमंत्री)
नागपंचमीत नाग,धामण यांचा हाताळणीत मृत्यू झाल्याची घटना कधी ही घडलेली नाही. त्यामुळे पूर्वी सारखाच हा उत्सव साजरा केला जावा याबाबतचा इतिहास सत्यजित देशमुख यांनी पूर्वीचा इतिहास सांगितला आहेचं .त्यामुळे ७ अथवा ८ जुलैला दिल्लीत होणाऱ्या बैठकीत आपण यशस्वी व्हाल. पुन्हा शिराळाकरांना जिवंत नागाची पूजा करण्याची संधी मिळावी. त्यासाठी मंत्री महोदयांनी प्रयत्न करावा.
आमदार जयंतराव पाटील
बिहार मधील सिलीया घाटमध्ये मध्ये हातामध्ये नाग घेऊन नागपंचमी साजरी होते.त्याच पद्धतीने शिराळ्यात नागपंचमी साजरी व्हावी .त्यासाठी तिथली माहिती घ्यावी .पुरावा म्हणून बिहारचे व्हिडीओ आहेत.
आमदार गोपीचंद पडळकर
कोट -
आमदार सत्यजित देशमुख यांनी नागपंचमी बबत चांगला प्रश्न मंडला आहे.कायद्याचे पालन करूच पण सरकार म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालया कडून शिथिलता मिळवावी .
आमदार अर्जुन खोतकर
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .
0 Comments