शिराळा,ता.२४:मिरवणूक मार्गांवर व अपत्कालीन सेवेला अडथळा येणार नाही याची विशेष काळजी घ्या.उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीचे स्ट्रॅक्टरल ऑडिट करा.ध्वनीप्रदूषण करून कायदा हातात घेणाऱ्यावर गुन्हे दाखल करू.ढोल ताशांचा वापर करणाऱ्या मंडळाना पारितोषिक देऊ.मंडळानी जस्ती जास्त पारंपरिक वाद्याचा वापर करत न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करून नागपंचमी साजरी करा असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले.
तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर आयोजित शिराळा नागरीक आणि नाग मंडळे यांच्या बैठकीत बोलत होते.यावेळी उपवनसंरक्षक सागर गवते,उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले,तहसीलदार शामला खोत-पाटील,पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी घुगे म्हणाले,कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे.तरुण वयात कायदाचे उल्लंघन करून विना कारण स्वतःवर गुन्हे नोंद करून आयुष्य उध्वस्त करू नका.नागपंचमी संयमाने आणि शांततेत साजरी करा.मिरवणूक वेळेची मर्यादा रात्री आठ वाजेपर्यंत आहे. आवाजाची मर्यादा ४५ डेसिबल असावी.त्यापुढे आवाज गेल्यास संबंधित मंडळावर गुन्हे दाखल केले जातील.कर्णकर्कश आवाजाचा त्रास वयोवृद्ध व लहान बालक व आजारी लोकांना होतं असतो.त्यामुळे नियमाचे पालन न करणाऱ्या मंडळावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.उच्च न्यायालयाचे निर्देश असल्याने बंधने ही असणारचं आहेत.सर्पमित्रांनी साहसी प्रकार करू नये.रस्ते, वीज,वाहतूक याबाबत जागरूकता असावी.मिरवणुक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.पुरावा म्हणून त्याचा वापर केला जाईल.विना कारण समाज माध्यमावर आक्षेपार्ह मजकूर,फोटो,व्हिडीओ टाकू नका.तसे केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील.आवाजासाठी एक बेसची मर्यादा आहे.इतर साहित्य जप्त केले जाईल.
उपविभागीय पोलीस अधिकारी थोरबोले,म्हणाले,मिरवणूक मार्गांवर रेंगाळु नका.मिरवणुकीत कोणत्या ही प्रकारचा ध्वज फिरवण्यासाठी परवानगी नाही.धोकादायक कमानीची पाहणी करून त्या काढण्यात येतील.मिरवणूक मार्गांवर कमान लावू नये.कमानीवरचा मजकूर अक्षपारी नसावा.नृतिका आणि सेलिब्रेटीला बंदी आहे.सकाळी दहा वाजता पालखी निघेल.पालखी मार्गांवर अडथळा येऊन देऊ नका.
उपवनसंरक्षक सागर गवते म्हणाले,प्रतिकात्म नाग पूजा करून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा.समाजमाध्यमावर तेड निर्माण करणारे कोणत्या ही प्रकारचे व्हिडीओ,मजकूर,फोटो टाकू नका आमचे लक्ष आहे.त्या पुराव्याच्या आधारे कारवाई केली जाईल.शिराळकरांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.
यावेळी जयसिंग गायकवाड,सम्राट शिंदे,अजय जाधव,श्रीराम नांगरे,राम पाटील,सचिन शेटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.बैठकीस रणजितसिंह नाईक,प्रमोद नाईक,पृथ्वीसिंग नाईक,सचिन नलवडे,अभिजीत शेणेकर,लालासो ताबीट,विरेंद्र पाटील,वसंत काबळे,सुधाकर कुंभार,फिरोज मुजावर,अविनाश खोत,संतोष हिरुगडे,स्वप्नील निकम,धन्वंतरी ताटे, उपस्थित होते.
आबलवृद्धासाठी एसटीची सोय करा
वाहनांची गर्दी असल्याने शिराळ्या पासून दूर तीन ते चार किलोमीटर वाहनतळ असल्याने अबालवृद्धाना रेड ते शिराळा अंबामाता मंदिराकडे येण्यासाठी पायपीट करावी लागते.त्यामुळे रेड-शिराळा एस.टी.बस सोय करण्याची मागणी करण्यात आली.
साहेब आश्वासन नको करावाई करा
एस.पी साहेब ध्वनी प्रदूषण करणाऱ्यावर कठोर कारवाई करा.आम्ही याबाबत जेष्ठ नागरिक संघटनेच्यावतीने तीन वर्षे निवेदन देतोय.पण आवाजवर बंधन येत नाही.आम्ही सणा दिवशी आमचं घरं सोडून दुसरीकडे जाऊन रहातोय.यावेळी आश्वासन नको कारवाई करा.
जयसिंगराव गायकवाड (जेष्ठ नागरीक)
0 Comments