BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कुस्ती मैदानाचा पाहडी आवाज

 

आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .


शिराळा :प्रत्येक माणसाकडे एक कला अथवा छंद असतो. मात्र त्याची  जोपासणा केलीच  जाते असे नाही. परिस्थितीने  तीच  कला  जगण्याचे साधन बनते.कुस्तीचे बाळकडू वडिलांच्या पासून मिळाले.पण दुर्दैवाने  उजवा हात निकामी झाल्याने कुस्ती थांबली. ऐन उमेदीच्या काळात  पैलवानकी बंद झाली.घरची परस्थिती  बेताची असल्याने मिळेल तो  कामधंदा करावा लागला.एका कारखान्यात नोकरी मिळाली पण नंतर तो  बंद झाल्यने तिथेही अपयश आले. त्यामुळे नोकरीचा नाद सोडुन यात्रा-जत्रेत फिरत्या रसवंतीचा व्यवसाय सुरु केला.यात्रेत कुस्ती मैदानात रस विकत असताना जेष्ठ कुस्ती निवेदक ईश्वर पाटील यांचे कुस्तीचे  धावते समालोचन कानावर पडले. तिथेच आयुष्याला कलाटणी मिळाली.आपण ही असे करू शकतो याचा अंदाज आला.अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देत शिराळा तालुक्यातील  माळवाडी (मेणी) सारख्या छोट्याशा गावातुन २२ मार्च २०११ साली कुस्ती निवेदनाचा  पहिला प्रवास सुरु झाला .आज महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक  राज्यातील बेळगाव व विजापूर या मराठीभाषीक सिमाभागातील दोन जिल्ह्यापर्यंत जाऊन पोहचलेला  तांबड्या  मातीतील रांगडा पहाडी आवाज म्हणजे कुस्ती निवेदक पैलवान सुरेश जाधव चिंचोलकर



  शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात  वसलेले व शेकडो वर्षाची कुस्तीची परंपरा व वारसा  लाभलेल गाव म्हणजे चिंचोली.घर तिथे पैलवान व मैदान तिथे कुस्ती हा चिंचोली गावचा इतिहास आहे.सुरेश जाधव यांच्या कुस्ती निवेदनाने आणखी गावच्या लौकिकात भर पडली आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातुन स्व.पै.जगन्नाथ जाधव यांनी आपले दोन चिरंजीव पै.सुरेश जाधव व पै.दिनेश जाधव यांना चांगल्या पध्दतीचे कुस्तीगीर बनवले. वडील स्व:ता ऊत्तम दर्जाचे पैलवान असल्याने घरातुनच त्यांना  कुस्तीचे बाळकडु मिळाल्याने  पै.सुरेश जाधव यांनी कुस्ती क्षेत्रामध्ये चांगले नाव कमवले.परंतू कुस्ती खेळत असताना  ऊजवा हात निकामी झाल्यामुळे पैलवानकी बंद झाली. त्यामुळे परिस्थितीने अंगी असलेल्या सुप्त निवेदक कलेला वाव मिळवून दिला. त्यांना लाभेल्या  करड्या, कडक पहाडी आवाजाने त्यांना जगण्याची नवी उमेद दिली.


मैदानात आलेल्या प्रत्येक लहान मोठ्या पैलवानांचे गाव ,नाव, तालुका ,जिल्हा ,तालीम ,वस्ताद यांचे अभ्यासपूर्ण विवेचन करत समोर  कुस्ती सुरू असताना डाव डावाची ऊकल, डाव प्रतिडाव याचे केलेले खुमाकदार वर्णन यामुळे कुस्तीशौकिनांच्यात चैतन्य संचारत असतो. कुस्ती मैदान आयोजक ,मैदानाचे देणगीदार, मैदानासाठी असणाऱ्या विविध क्षेत्रातील लोकांचे आगळ्या वेगळ्या शैलीत केलेले स्वागत व सत्काराचे आदरातीत्य हे विशेष कौशल्य त्यांना  लाभलेल आहे.

 त्यांच्या निवेदनात  जुन्या जाणत्या पैलवानांचा, वस्तादांचा,तालमीचा इतिहास यांचा आवर्जुन उल्लेख असतो.रामायणातील व महाभारतातील अनेक दाखले दिले जातात.कुस्तीचे प्रकार,पौराणिक कुस्तीतील व आधुनिक कुस्तीतील फरक,गाथेतील वाक्य ज्ञानेश्वरीतील व हरीपाठातील ओव्या,मातीतील कुस्ती व मॅटवरील कुस्ती यामधील अंतर त्याचबरोबर राज्य राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय कुस्तीची नियमावली,त्रेतायुग,द्वापरयुग,सत्ययूग ,कलियुग या युगात झालेल्या कुस्तींचे दाखले व स्थित्यांतरे याचा सर्व लेखाजोखा मैदानामध्ये सहज मांडतात. केवळ दाखले न देता अधुन मधुन मैदानात घडणाऱ्या घटनातून  विनोदाची झालर हि कुस्ती शौकिनांच्यात कानाला स्पर्श करून गेल्या शिवाय राहत नाही. त्यांनी आता पर्यंत एक  हजार कुस्ती मैदानांचा टप्पा यशस्वी पार केलेला आहे.‌

Post a Comment

0 Comments