शिराळा,ता.२०: रेड (ता.शिराळा) येथे ट्रॅक्टर ट्रॉली मिक्सरला धडकून पोलीस हवलदार स्वप्नील हरी दमामे (रा. आष्टा ता. वाळवा ) हे जखमी झाले आहेत.त्यांच्या मोटारसायकलचे १० हजाराचे नुकसान झाले आहे.या प्रकरणी ट्रॅक्टर चालक तुषार अशोक जाधव (रा. एमडी पवार चौक ,उरूण इस्लामपूर ता. वाळवा) याच्यावर शिराळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस हवलदार राजाराम गंगाराम देवळेकर यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे.ही घटना १९ जुलै रोजी रात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास रेड गावच्या हद्दीत घडली.
या बाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी,१९ जुलै रोजी ट्रॅक्टर चालक तुषार अशोक जाधव याने बिना नंबरची ट्रॅक्टर-ट्रॉली मिक्सर रेड गावचे हद्दीत शिराळा ते इस्लामपूर जाणा-या डांबरीरोडला लागून असलेला जुन्या रेठरे धरण रोड फाट्याजवळ निष्काळजीपणे रोडवर पांढ-या पट्टाच्या आत रहदारीस अढथळा होईल अशा स्थितीत लावला होता.
त्याने रहदारीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची सुरक्षा न घेता व रिफ्लेक्टर न लावता रात्रीचे वेळी ट्रॅक्टर-ट्रॉली-मिक्सर असे जोडलेले वाहन उभे केल्याने त्यास मोटारसायकल स्वार पोलीस हवलदार स्वप्नील हरी दमामे हे धडकून झालेल्या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या मोटारसायकलचे अंदाजे दहा हजाराचे नुकसान झाले आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात करत आहेत.
0 Comments