BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

----तर शिराळा नगरपंचायतमध्ये कुत्री सोडून आंदोलन करण्याचा इशारा

 


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .

शिराळा ७ जुलै २०२५ :शिराळा शहरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या पिसाळलेल्या व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास नगरपंचायतमध्ये जिवंत कुत्री सोडून आंदोलन करण्याचा इशारा ॲड.सम्राट शिंदे,सत्यजित कदम व नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाला प्रतिकात्मक कुत्र्याचा टेडी भेट देऊन निवेदनाद्वारे दिला.

    शिराळा शहरातील वाढलेल्या व पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे मोकाट कुत्र्यांनी गेले आठ-दहा दिवस शिराळा शहरात धुमाकूळ घातला आहे.दिवसेंदिवस त्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.कुत्र्यांनी शिराळा शहरातील पाच ते सहा महिला व लहान मुलांना चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे.

   शहरातील जेष्ठ नागरिक,लहान मुले,महिला यांना जीव मुठीत घेऊन शिराळा शहरात फिरावे लागत आहे.त्रस्त नागरिकांनी नगरपंचायतला वारंवार याबाबत कळविले आहे.मात्र नगरपंचायतने याबाबत कोणतीच कारवाई केलेली नाही.त्यामुळे शहरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे मागण्या मान्य न केल्यास जिवंत कुत्री सोडून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडून अन्य ठिकाणी सोडावी.जिल्ह्यातील व इतर भागातील नगरपालिका व महानगरपालिकातील कुत्री रेठरे धरण परिसरात सोडली जातात. त्यांना याबाबत कल्पना देऊन पत्रव्यवहार करा.शहरातील कुत्र्यांचे रेबीजचे लसीकरण करून घ्या.शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करा अशी मागणी केली आहे.या निवेदनावर अविनाश खोत,रफिक अत्तार,संदीप गवळी,सूरज तेली,बी.एम कदम,सुजय गांधी,अनिल माने,योगेश नलवडे,ओमकार शिंदे,राजू पाटील यांच्या सह्या आहेत.

मोकाट कुत्र्यांमुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. येणाऱ्या नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा बंदोबस्त न झाल्यास मोठा अनर्थ घडेल नगरपंचायतने याबाबत तात्काळ कारवाई न केलीस नाईलाजावस्त आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल 

सत्यजित कदम (युवक)

 

शिराळा नगरपंचायत चे नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेकडे दुर्लक्ष आहे.नवीन मुख्याधिकारी यांच्याकडून गतिमान कारभारची अपेक्षा आहे.महाराष्ट्र नगरपंचायत अधिनियम १९६५ कलम २४० तथा २४१ कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी कलम २९३ ची विशेष तरतूद असून याबाबत नगरपंचायतने तात्काळ भूमिका न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.

ॲड. सम्राट शिंदे (वंचित बहुजन आघाडी)

वाजता गाजत मिरवणूक 

प्रशासनाला जाग यावी म्हणून आज शिराळच्या आठवडा बाजारातून कुत्र्याचा बंदोबस्त करावा असे फलक दाखवत व प्रतिकात्मक टेडी कुत्रा सोबत आणून वाजत गाजत निवेदन देण्यात आले.



Post a Comment

0 Comments