BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आषाढी एकादशी निमित्ताने शिक्षणिक दिंडी सोहळा

 


पणुंब्रे वारूण:मातोश्री मीनाताई ठाकरे विद्यालय

शिराळा,ता.६: इथं ज्ञानोबा अवतरला,तुकोबा भरून पावला... विठ्ठला तुझं रूप पाहून आज सारा परिसर दुमदुमला पंढरी कुठेही साकारता येते असा जणू प्रत्यय पणुंब्रे वारूण ता शिराळा येथील मातोश्री मीनाताई ठाकरे विद्यालयात आला.

 भक्तीत तल्लीन शाळेचे विद्यार्थी पाहून आज साक्षात इथे विठ्ठल अवतरलाही असावा.. अन् विटेवर उभा राहून त्याने मायेचा हात प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीवरून फिरवलाही असावा.. एरव्ही ज्ञानाचा चरणामृत विद्यार्थ्यांना पाजणारा शिक्षकवृंदही विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झाला होता. गावातील लोकांनीही पंढरीचा विठ्ठल मनोभावे आपल्या दृष्टीत सामावून घेतला. शेवटी देवचं तो जिथं निस्वार्थ भक्ती अन् मनाची निरागसता असते त्या- त्या ठिकाणी विठ्ठल अवतरतोच.याचा प्रत्यय आज मातोश्री मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालयामध्ये आषाढी एकादशी निमित्त आला. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वारकरी दिंडी मध्ये सकाळपासून वारकऱ्याच्या वेश्यामध्ये व टाळ मृदुंगाच्या उद्घोषामुळे शाळेचा परिसर दुमदुमला.शाळेमध्ये विठ्ठल नामाची शाळाच भरली होती. बाल वारकऱ्यांच्या दिंडी गावामध्ये येताच गावकऱ्यांनी दिंडीचे पूजन करून ते दिंडीमध्ये सामील झाले. ग्रामपंचायत जवळ विद्यार्थ्यानी रिंगण सोहळा सादर केला.

➖➖➖➖


शिराळा:सह्याद्री पब्लिक स्कूल


शिराळा,ता.६:सह्याद्री पब्लिक स्कूलच्यावतीने आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन शिराळा शहरात करण्यात आले होते.यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून टाळ, मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम अभंगाच्या तालावर नाचत वारीत सहभाग घेतला.विठोबा माऊलींचा गजर करत शहरातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली.वारीमध्ये विठ्ठल रुक्मिणी,निवृत्ती,ज्ञानदेव,सोपान,मुक्ताबाई,एकनाथ,नामदेव,तुकारा म या संतांची वेशभूषा करून विद्यार्थी सहभागी झाले होते.

    विठू नामाचा गजर करत अनेक चौकामध्ये भक्ती गीत व कला नृत्याचे प्रदर्शन करण्यात आले.मुलांच्या या वारीमुळे शहरात भक्तीमय वातावरण तयार झाले.सर्व नागरिकांनी विठू नामाच्या गजरात दंग होऊन या दिंडी सोहळ्याचा आनंद घेतला.अनेक ठिकाणी नागरिकांनी मुलांच्या या दिंडी सोहळ्याचे कौतुक करत मुलांना खाऊ वाटप केले.

  राजेंद्र इथापे,सुनील पाटील,सुकेशनी दळवी,दीपा उबाळे यांनी या पालखी सोहळ्यासाठी भेट दिली.प्राचार्या शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या दिंडी सोहळ्याचे यशस्वी नियोजन केले.

➖➖➖➖➖


कापरी :जिल्हा परिषद शाळा  

शिराळा:जिल्हा परिषद शाळा कापरी येथे आषाढी एकादशीनिमित्त  महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा जपत शैक्षणिक  दिंडी उत्साहात पार पडली. दिंडीची सुरुवात भजन म्हणत, मूर्ती पूजनाने शाळेच्या प्रांगणातून झाली. यावेळी शाळेच्या प्रांगणात विठूचा गजर,राधाकृष्ण गोपाल कृष्ण रा, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, चला पंढरीला जाऊ, आदी अभंग म्हणत ढोल ताशा, टाळ व टाळ्यांच्या गजरात गावातून पार पडली. यावेळी सर्व विद्यार्थी , शिक्षक व पालक विठ्ठल रखुमाईच्या  पारंपरिक वेषात दिंडीत सहभागी झाले होते ‌ यावेळी डोक्यावर तुळस विठ्ठल रखुमाई ची मूर्ती पाण्याने भरलेल्या कळश्या घेऊन मुली सहभागी झाल्या होत्या.यावेळी कापरी गावातून दिंडीचे स्वागत व विठुरायाच्या मूर्तीचे पूजन  गावातील महिला भगिनींनी  आपापल्या अंगणात उत्साहात केले. यावेळी सुषमा पाटील यांनी गुळाच्या वड्या प्रसाद म्हणून वाटप केले.यावेळी गावातील महिला व ग्रामस्थ यांनी दिंडीचे स्वागत उत्स्फूर्तपणे केले. विद्यार्थ्यांनी विठू माऊलीचा पारंपारिक पोशाख हुबेहूब करून लोकांचे आकर्षण करून घेतले. यावेळी विद्यार्थ्यांना आपला सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा रूढी परंपरा ,चालीरीती, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या दिंडीमध्ये शाळा  शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुषमा पाटील, सचिन पाटील ,मुख्याध्यापिका शर्मिला पवार उपशिक्षिका उषाताई गायकवाड, प्रियांका पाटील, प्रसाद पाटील,दिपाली पाटील, अंगणवाडी सेविका सुषमा खबाले,विद्या कांबळे, मनिषा सुतार, अनिल पाटील,नेहा जाधव,प्रतिभा पाटील,लक्ष्मी पाटील आदी गावातील महिला पालक व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

➖➖➖➖➖➖➖➖


 तडवळे:जिल्हा परिषद शाळा

शिराळा:जिल्हा परिषद शाळा तडवळे येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधत, महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा जपत आनंददायी शिक्षणाची वारी दिंडी उत्साहात पार पडली. दिंडीची सुरुवात ग्रंथपूजन, मूर्ती पूजनाने शाळेच्या प्रांगणातून झाली. यावेळी शाळेच्या प्रांगणात राधाकृष्ण राधा, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, चला पंढरीला जाऊ, आदी अभंग म्हणत ढोल ताशा, टाळ व टाळ्यांच्या गजरात रिंगण केले. यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षक पालक पारंपरिक वेषात दिंडीत सहभागी झाले होते ‌ यावेळी डोक्यावर तुळस विठ्ठल रखुमाई ची मूर्ती पाण्याने भरलेल्या कळश्या घेऊन मुली सहभागी झाल्या होत्या.यावेळी तडवळे गावातून दिंडीचे स्वागत व विठुरायाच्या मूर्तीचे पूजन सरपंच प्रियांका पाटील व गावातील महिला भगिनींनी  आपापल्या अंगणात उत्साहात केले. यावेळी उर्मिला पाटील यांनी सर्व विद्यार्थी विठू माऊलींना चिरमुरे व प्रसादाचे वाटप केले. यावेळी गावातील महिला व ग्रामस्थ यांनी दिंडीचे स्वागत उत्स्फूर्तपणे केले. विद्यार्थ्यांनी विठू माऊलीचा पारंपारिक पोशाख हुबेहूब करून लोकांचे आकर्षण करून घेतले. यावेळी विद्यार्थ्यांना आपला सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा रूढी परंपरा ,चालीरीती, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या दिंडीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश गायकवाड मुख्याध्यापक शिवाजी पाटील, उपक्रमशील शिक्षक मोहन पवार शिक्षिका गौरी गायकवाड स्नेहल पाटील गणेश पाटील, विशाल चव्हाण ,तनुजा पाटील ,मीनल माने, तेजस्विनी बोने, विशाखा पाटील, प्रीतम गायकवाड, शुभांगी लोहार ,पूजा पाटील , शितल माने, आदी गावातील महिला पालक व ग्रामस्थ सहभागी झाले होते.


Post a Comment

0 Comments