BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मोकाट कुत्र्यांनी उडवली शिराळकरांची झोप

 



आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .

शिराळा,ता.५ :शिराळा शहरात मोकाट  कुत्र्यांचा वावर वाढला असल्याने लहान मुलांच्यासह शालेय मुली व महिलांना रस्त्यावर फिरणे मुश्कील झाले आहे. दोन दिवसा पूर्वी शिराळा येथे तीन महिला व एका पुरुषावर कुत्र्याने हल्ला करून जखमी केले होते.या घटनेमुळे लहान मुलांचे पालक भयभयीत झाले आहेत.त्यामुळे  नगरपंचायतने या मोकाट कुत्र्यांचा  बंदोबस्त करावा अशी मागणी रहिवाशी व प्रवाशी  यांच्याकडून होत आहे.

शिराळा येथे प्रत्येक चौकात व गल्ली बोळात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शिराळा बस स्थानक परिसर,नगरपंचाय , मटण  मार्केट ,इस्लामपूर-कोकरूड या मुख्यरस्त्यावर व प्रत्येक चौकात २०  ते ३०  कुत्र्यांचा कळप सतत फिरत आहे.अनेकवेळा मोटरसायकलच्या आडवे येत असल्याने अपघात झाले आहेत. काहींच्या अंगावर जाण्याचे प्रकार घडले आहेत. मटन मार्केट परिसरातून  महाविद्यालयाकडे मुलींना सकाळी जावे लागते.सकाळी बहुतांशी दुकाने बंद असतात.त्यामुळे इतर लोकांची वर्दळ कमी असते. त्यामुळे  या मार्गावरून  जाणाऱ्या  महिला व लहान मुले,शालेय मुली यांच्या मनात कुत्र्यांचे कळप पाहून भीती निर्माण होत आहे. शिराळा शहर परिसरात  बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्याला कुत्रे हे खाद्य सहज उपलब्ध होत असल्याने त्याने नागरी वस्तीत शिरकाव केला आहे. त्यामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. इस्लामपूर-कोकरूड या मुख्यरस्त्यावर कुत्र्यांचे कळप फिरू लागले असल्याने चार चाकी वाहनधारक हि त्रस्त झाले आहे.त्यामुळे नगरपंचायतने ह्या भटक्या व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. 

एकाच दिवशी चौघावर हल्ला 

गुरुवारी (ता.३)रोजी  निकम गल्ली येथे जयश्री पाटील ह्या  बाजारात निघाल्या असता त्यांच्यावर दोन कुत्र्यांनी अचानक हल्ला केला.इतर ही  काही कुत्री हल्ला करण्यासाठी जात असताना  नागरिकांनी त्यांना हुसकावून लावल्याने  त्या वाचल्या.त्या नंतर मन्सूर मुल्ला ,स्वराली दळवी,जयश्री आंबर्डेकर यांना ही कुत्र्याने चावा घेतला होता.

शिराळा शहरात सध्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.याबाबत लोकांनी वारंवार आवाज उठवून ही त्याची दाखल घेतली जात नाही.आता कळपाणे फिरणारी कुत्री माणसांवर चाल करू लागली आहेत.उद्या लहान मुलांच्यावर हल्ले झाले तर आणखी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे नगरपंचायतने याची दखल घेऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा

संतोष इंगवले (नागरिक व व्यापारी) 



Post a Comment

0 Comments