शिराळा:माणसाचा अपघात झाला तर त्याच्या मदतीस नातेवाईकांच्यासह माणुसकी म्हणून इतर माणसं धावतात.परंतु प्राण्यांचा अपघात झाला ते मदतीसाठी त्यांचा फक्त आक्रोश सुरु असतो. शिराळा येथे मृत वानराच्या पिल्लास बाटलीतून दुध पाजून माणसान जीवदान दिल.परंतु त्या आई पासून पोरक्या झालेल्या पिल्लास आपलं दुध पाजून कळपात घेवून एका वानराच्या मादीने आपलं मातृत्व दाखवून मुक्या प्राण्यांचे प्रेम काय असते हे दाखवून दिले.या हृदयस्पर्शी प्रसंगाने त्या ठिकाणी असणाऱ्या वन कर्मचाऱ्या सह प्राणी मित्रांचे डोळे अपोआप पाणवले.
परवा काल शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास वाटेगाव ता,वाळवा येथील राजेश साळुंखे यांनी शिराळा वन विभागास एक वानर बांबवडे (ता.शिराळा) येथील फाट्यावर आपल्या पिल्ला समवेत गाडीला धडकले असल्याने त्यास हालचाल करता येत नाही असे संगितले. त्यावेळी घटनास्थळी वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांचा मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे,वनरक्षक दत्तात्रय शिंदे,रेस्कु टीमचे सदस्य संतोष कदम, प्राणीमित्र प्रा.सुशिलकुमार गायकवाड,गणेश निकम हे गेले.त्यावेळी ती घटना पाहणाऱ्या काही लोकांनी वानर आपल्या पिल्लासह गाडीला धडकल्यानंतर कुत्र्यांनीही याच्यावर हल्ला केल्याचे सांगितले. त्या नंतर जीवाच्या आकांताने वानर जखमी अवस्थेत एका वस्तीवर असणाऱ्या कडबा व भिंतीच्या मध्ये सहा इंचाच्या फटीत आपल्या पिल्लासह विसावले.त्यामुळे त्यांचा कुत्र्यांच्या तावडीतून जीव वाचला.गाडीच्या धडकेत वानराच्या डोक्याला व पायाला गंभीर इजा झाल्याने त्यास व्यवस्थित चालता येत नव्हते.त्यामुळे त्याच्या समवेत पिल्लाच्या जीवालाही धोका होता.त्यामुळे वानरास पिल्लासह रेस्क्यू करुन पुढील उपचारासाठी वनविभागात आणले.
त्यावेळी अंधार पडलेला होता. त्यांचावर पशुवैद्यकीय डॉ.सुशांत शेणेकर यांनी उपचार केले.मात्र गंभीर जखमी झाल्याने वानराचा मृत्यू झाला.त्यामुळे चिमुकल्या पिल्लाचं काय करायचं हा प्रश्न होता. त्यास झाडाखाली ठेवले परंतु अंधार असल्याने इतर वानरे खाली आली नाही. त्यावेळी प्राणीमित्र प्रा. सुशीलकुमार गायकवाड यांनी त्या पिल्लास आपल्या सोबत घरी नेऊन रात्रभर गजर लावून दोन दोन तासाच्या अंतराने बाटलीने दुध व पाणी पाजून सकाळी वन कार्यलयात आणले. त्यास झाडा खाली ठेवले असता त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने इतर वानरे गोळा झाली.त्यातील एका वानराने त्या पिल्लास झाडावर नेले. त्याला कुठे काय लागले आहे का याची खात्री केली. त्यानंतर त्या पिल्लाची काळजी इतर वानरे ही घेत असल्याचे वन कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. यासाठी वन विभागाने त्या परिसरात कॅमेरे लावून ठेवले होते. दोन तसा नंतर त्या ठिकाणी आपल्या लहान पिल्लासह आलेल्या वानराने त्या पिल्लास आपले दुध पाजून आपल्या सोबत घेतले.त्यावेळी मुक्या प्राण्यांच्या भावनिक क्षणाने उपस्थित सर्वांच्या डोळ्याच्या कडा अपोआप ओलावल्या. त्या पोरक्या झालेल्या पिल्लास आईची माया मिळाली.
ते लहान पिल्लू असल्याने त्यास दोन दोन तासाला दुध आणि पाणी पाजणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.त्यामुळे त्यास मी.घरी घेवून आलो. दोन दोन तासाचा गजर लावून त्यास रात्रभर त्यास बाटलीने दुध व पाणी पाजले.त्याचा जीव वाचला आणि त्यास इतर वानरांनी आपल्या कळपात घेऊन एका वानराने आपलं दुध पाजून आईची माया दिली.हा क्षण आमच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण आहे.
प्रा.सुशीलकुमार गायकवाड(प्राणीमित्र )
0 Comments