BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोलीत अतिवृष्टी:72 मी.मी.पाऊस

 



शिराळा,ता.६ : चांदोली परिसरात अतिवृष्टी झाली असून २४ तासात  ७२ तर ८ तासात १५ मी.मी.असा  आज अखेर एकूण १३७९  मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. एका दिवसात धरणात १ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. धरणात २८. ०७   टी.एम.सी पाणीसाठा आहे. ६२०.२०  मीटर पाणी पातळी  तर पाणीसाठा ७९५ .०१९  द.ल.घ.मी  झाला आहे.धरणात १२०५२ कुसेक  पाण्याची आवक सुरु असल्याने सांडव्यातून २८७० तर  विद्युत निर्मितीमधून १६३० असा एकूण ४५००  कुसेक  विसर्ग वारणा नदीत सुरु आहे.त्यामुळे वारणा काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.वारणेचे पाणी पोट मळीत गेल्याने काही ठिकाणी नदी काठची पिके पाण्याखाली जाऊन लागली आहेत. शिराळा तालुक्यात इतरत्र पावसाचा जोर कमी आहे.

धरणाची पाणी पातळीत  सांडवा पातळीच्या वरती असली असल्याने  कला शनिवारी वारणा धरणाचे चार दरवाजे दरवाजे उचलून सांडव्यातून  २८७०  क्युसेक व विद्युतगृहामधून  १६३०  क्युसेक असा एकूण ४५०० क्युसेक  विसर्ग सोडण्यात आला होता.नंतर सायंकाळी पावसाचा जोर थोडा कमी झाल्याने  सांडव्यातून  १४७०  क्युसेक व विद्युतगृहामधून  १६३०  क्युसेक असा ३१०० कुसेक विसर्ग सुरु केला होता.त्यानंतर रात्री आठ वाजता पुन्हा पाणी पातळी वाढल्याने  सांडव्यातून  २८७०  क्युसेक व विद्युतगृहामधून  १६३०  क्युसेक असा एकूण ४५०० क्युसेक  विसर्ग सोडण्यात आला तो  अद्याप कायम आहे.त्यामुळे काल पासून वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.पाणी पात्राबाहेर पडल्याने पाणी पोट मळीत आल्याने काही ठिकाणी वारणा काठची पिके पाण्याखाली गेली आहेत.चरण येथील स्मशानभूमीत पाणी शिरले आहे.

 मंडलनिहाय पडलेला पाऊस कंसात एकूण पाऊस मिली मीटर मध्ये असा...

कोकरूड ३५.८ (१४०.९)

शिराळा   (५३.९ )

शिरशी २४.८  (८०.१ )

मांगले -१२  (६५.९)

सागाव - १९.८ (९६.१  )

चरण ५० (२१४.४   )

वारणावती ७२  (१३७९)

Post a Comment

0 Comments