शिराळा: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकाना केंद्रबिंदू मानुन काम करत असल्यामुळे आज पक्षाची ताकद वाढत आहे.यापुढील काळात सर्वच निवडणुकांमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष अग्रभागी असलेला दिसेल असे प्रतिपादन राज्याचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष,माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले.
शिराळा संपर्क कार्यालय येथे शिराळा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा महिला कार्यकारणी मध्ये निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक यांची प्रमुख उपस्थित होती.
सौ. नेहा नरेंद्र सूर्यवंशी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा वकील संघटनेच्या संघटक पदी,येडेनिपाणी (ता.वाळवा) येथील सौ.रुपाली महेश शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांगली जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी बिऊर (ता. शिराळा) येथील अनुसया आनंदराव पाटील यांची सांगली जिल्हा महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी व सौ.सीमा प्रदीप कदम यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या शिराळा तालुका अध्यक्षपदी निवड झाली. या निवडीचे पत्र सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष निशिकांत पाटील व सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.साधना सिद्धार्थ कांबळे -धेंडे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
नाईक म्हणाले, सांगली जिल्ह्याला निशिकांत पाटील यांच्यासारखा स्वच्छ प्रतिमेचा कर्तबगार उच्च विचाराचा राष्ट्रवादी पक्षाला जिल्हा अध्यक्ष मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील समर्पित व निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या आपल्या कार्यकर्त्याला पदाधिकारी म्हणून निश्चितपणे काम करण्याचा अभिमान असून संघटना वाढीस मोठा उपयोग होणार आहे. शिराळा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षाचा विचार निश्चितपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करून बुथ निहाय कार्यकर्त्यांचे संघटन करण्याचे काम करतील. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पक्षीय पातळीवरून ज्या सूचना येतील त्या पद्धतीने लढवून आपल्याला संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये मोठे यश संपादन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा.
रणधीर नाईक म्हणाले,माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या पाठीमागे जी कार्यकर्त्यांची फळी आहे ती अत्यंत निस्वार्थी भावनेने व प्रामाणिकपणे संघटन वाढीचे काम करत आहे.शिराळा मतदारसंघांमध्ये शिवाजीराव नाईक यांचे कार्यकर्ते या पुढील काळात राष्ट्रवादी पक्षाच्या विचाराचे चित्र खऱ्या अर्थाने अधिक प्रगतशील दिशेने रेखाटण्याचे सुंदर काम करतील.आता पर्यंतच्या नाईक साहेबांच्या राजकीय वाटचालीचे श्रेय त्यांनी जोडलेल्या गावागावातील वाडी वस्तीवरील प्रत्येक कार्यकर्त्याला जाते.या पाठबळामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी आपले नेते शिवाजीराव नाईक यांना प्रदेश कार्यकारणीवर उपाध्यक्ष पदाची धुरा देऊन सन्मानित केले. या पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला मोठे यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे सांगितले.
या वेळी संचालक रघुनाथ पाटीला, उत्तम निकम उत्तम डांगे, महेश पाटील, अर्जुन कुरणे,प्रदीप कदम, विजय महाडिक, वैभव कांबळे, महेश शिंदे, उत्तम पाटील,जावेद काझी, कमलाकर सूर्यवंशी उपस्थित होते.
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .
0 Comments