सांगली,ता.१० : जिल्ह्यातील फळांवर प्रक्रिया करून सांगली जिल्ह्याचा एक ब्रँड निर्माण करावा. त्यासाठी शासकीय योजनांची मदत घ्यावी. चांगल्या दर्जाचे प्रक्रियायुक्त पदार्थ ग्राहकांना देण्याच्या उपक्रमाला सदैव पाठिंबा राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.
कुपवाड येथील पियुष कॅनिंग अँड फ्रुट प्रोसेसिंग युनिट येथे फळे व कृषि मालावरील मूल्यवर्धनाच्या संधी व महत्त्व आणि महिला बचत गटातील महिलांना व्यवसायाच्या नवीन संधी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे, युनिटच्या प्रमुख मीनल भोसले व प्रतापराव भोसले, प्रतापराव पाटील, बचत गटातील महिला व नागरिक उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी महिला उद्योजकांच्या मालाची विक्री व शहरातील बाजारपेठेची अडचण सोडविण्यासाठी डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्मवर काम कसे सोपे होईल याबाबत सांगितले. त्यासाठी लगेचच खरेदीदार, विक्रेत्यांच्या बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन तात्काळ करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना यावेळी दिल्या. उत्पादकांच्या पॅकिंगवर “आमची सांगली, आमचा अभिमान” हे ब्रीद वाक्य त्यांनी यावेळी सुचविले.
कुंदन शिनगारे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्ह्यातील सुरू असलेल्या बचत गटांच्या उपक्रमांची व प्रकल्पांची माहिती विषद केली. फळ प्रक्रिया, कौशल्य प्रशिक्षण यामध्ये महिलांच्या माध्यमातून छोट्या-मोठ्या व्यवसायांची वृद्धी करता येण्याची जिल्ह्याची प्रचंड क्षमता असल्याचे ते यावेळी म्हणाले.
प्रास्ताविकात मीनल भोसले व प्रतापराव भोसले यांनी पियुष स्कॅनिंग युनिटची गेल्या 30 वर्षातील मूल्यवर्धनातील कामगिरी विषद केली. तसेच बाजारपेठेतील प्रक्रियायुक्त आणि मुख्यतः आंबा, द्राक्षे, पेरू, चिंच, सीताफळ इत्यादी वरील मूल्यवर्धनामुळे किती नफा मिळू शकतो व उच्च दर्जा कसे टिकवता येईल याविषयी माहिती दिली.
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .
0 Comments