शिराळा,ता.११: आमदार सत्यजित देशमुख यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली पंचायत समिती शिराळा यांच्या वतीने आमसभा ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता पंचायत समिती प्रांगणात आयोजित करण्यात येत असल्याची माहिती गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी दिली..
यावेळी पोळ म्हणाले,या आमसभेचे अध्यक्षस्थान आमदार सत्यजित देशमुख हे भूषविणार आहेत.सभेत तालुक्यातील सन २०२४–२५ या आर्थिक वर्षातील कामकाजाचा आढावा तसेच २०२५–२६ या आर्थिक वर्षासाठी विकास आराखड्याचे नियोजन करण्यात येणार आहे.सदर आमसभेत नागरिकांचे प्रश्न, तक्रारी, सूचना, तसेच विविध विभागीय अधिकाऱ्यांचे प्रस्ताव विचारात घेऊन नियोजनबद्ध कार्यवाही करण्यात येईल. पंचायत समिती शिराळा कार्यालयात प्राप्त झालेल्या नागरिकांच्या अर्जांवरही या सभेत सविस्तर चर्चा होणार आहे. तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपले निवेदन, प्रश्न, तक्रारी 31 ऑक्टोबर 2025 पूर्वी पंचायत समिती शिराळा कार्यालयात सादर करावे.
शिराळा तालुक्यातील सर्व पदाधिकारी, विभागप्रमुख, अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती माजी सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, रास्त भाव दुकानदार, पोलीस पाटील, नागरीक, शासकीय व निमशासकीय संस्था तसेच सर्व स्थानिक प्रतिनिधींनी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व अधिकारी यांच्यात समन्वय राहून अधिकाधिक चांगले नियोजन करता येईल यासाठी पंचायतराज समितीच्या शिफारशीनुसार आमसभा घेण्याची तरतूद केलेली आहे. शिराळा तालुक्यातील प्रशासकीय कामांना गती प्राप्त होण्यासाठी आणि नागरिकांचे प्रश्न वेळेत सोडवण्यासाठी ही आमसभा महत्त्वाची आहे. त्यामुळे शिराळा तालुक्यातील सर्व नागरिकांनी या आमसभेत सक्रिय सहभाग नोंदवावा.
(सत्यजित देशमुख)
अध्यक्ष आमसभा तथा आमदार, शिराळा विधानसभा मतदारसंघ
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .
0 Comments