BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विश्वास तर्फे होणार शेतकऱ्यांची दिवाळी गोड

 

शिराळा : विश्वासराव नाईक साखर कारखान्यास सन 2024-25 मध्ये गळपास ऊस पाठवलेल्या शेतकऱ्यांना ही दिवाळी गोड करण्यासाठी प्रतिटन 50 रुपये विना कपात  देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, अशी माहिती अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष मा. बाबासाहेब पाटील व सर्व संचालक, कार्यकारी संचालक उपस्थित होते. 

ते म्हणाले, पूर्वी एकरकमी प्रतिटन 3 हजार 225 प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे अदा केले आहेत. आता 50 रुपये देणार असून एकूण दर 3 हजार 275 रुपये प्रतिटन झाला आहे. ‘विश्वास’च्या संचालक मंडळाने काल (ता. 9) कामगारांनी 12 टक्के बोनस जाहीर केला आहे. त्याबरोबर आज प्रतिटन 50 रुपये जाहीर करून कामगारांबरोबर शेतकऱ्यांचीही दिवाळी गोड होणार आहे. सन 2024-25 हंगामात साडेपाच हजार टन प्रतिदिनी प्रमाणे 4 लाख 43 हजार 16 मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यातून 5 लाख 32 हजार 730 साखर पोती उत्पादन झाले होते. कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद, बिगर सभासद व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांनी सातत्याने विश्वास कारखान्यावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ऊस दर देण्याची जबाबदारी आम्ही पार पाडत आलो आहे. सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी हा विकासाचा केंद्रबिंदू मानून आजपर्यंत विश्वासने दमदार वाटचाल केली आहे. 

अध्यक्ष श्री. नाईक, सभासद, बिगर सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी यांच्या हिताचे निर्णय घेऊन जास्त ऊस दराची परंपरा कायम ठेवली आहे. कारखान्यात १०५ के. एल. पी. डी. क्षमतेचा इथेनॉल निर्मिती प्रकल्प कार्यान्वित केला आहे. सर्व यंत्रणेचे आधुनिकीकरण केले आहे. कारखान्याची आर्थिक स्थितीही भक्कम आहे. ठिबक सिंचन, कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) तंत्रज्ञान अनुदान, पतीवर खते व औषधे, एक रुपयात उसाचे बियाणे, माफक दरात कंपोस्ट व कारखाना बनवत असलेली द्रवरूप जिवाणू खते शेतकऱ्यांना दिली जात आहेत. ग्रामीण व डोंगराळ भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्‌या सक्षम झाला पाहिजे, या हेतूने आजवर कारखान्याने वाटचाल केली आहे. 

श्री. नाईक म्हणाले, साखर कारखानदारीपुढे अनेक अडचणी आहेत. असमतोल पावसामुळे गेल्या काही वर्षात उसासह सर्व पिकांना मोठा फटका बसला आहे. परिणामी कारखान्यास तोटा सहन करावा लागत आहे. साखरेच्या अस्थिर किमती, मागणीत घट, केंद्र सरकारचे निर्यात धोरण व केंद्राने उसाच्या खरेदी दरात केलेली वाढ व साखरेच्या विक्री दरात वाढ न केल्याने एकूण साखर व्यवसायापुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरीही विश्वास कारखान्यावर ऊस उत्पादकांनी विश्वास कायम ठेवला आहे. त्यामुळे सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला सर्व ऊस 2025-26 च्या गळीत हंगामासाठी कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी शेवटी केले. 

-------------------------- 



व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....





View this post on Instagram

A post shared by shivaji chougule (@shivajichougule91)


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .



  

Post a Comment

0 Comments