शिराळा: १४ नोव्हेंबर २०२५ तीन वर्षांची तरुण, तडफदार वाघीण “चंदा”अखेर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चांदोलीत दाखल झाली असून, या आगमनाने प्रकल्पाला पहिली “वनलक्ष्मी” लाभल्याचा ऐतिहासिक क्षण साकारला आहे. सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यांत नव्या आशेचा श्वास भरत, जैवविविधतेस नवी ऊर्जा देणारे हे पुनर्वसन वनविभागाच्या महत्त्वपूर्ण यशाची नोंद ठरले आहे.सह्याद्रीच्या दैदिप्यमान घाटमाथ्यावर वन्यजीव संरक्षणाच्या दिशेने एक महत्वाची पायरी गाठली आहे. या अनोख्या आगमनाने व्याघ्र संवर्धनाला नवी उभारी मिळत असून सह्याद्रीची जैवविविधतेची श्रीमंती अधिकच बळकट होणार आहे.वन विभागाच्या काटेकोर नियोजनानंतर झालेले हे स्थानांतरण सह्याद्रीतील व्याघ्रसंवर्धनासाठी नवे पर्व ठरणार आहे.
महाराष्ट्र वन विभागाने “ऑपरेशन तारा” या राज्यातील दीर्घकालीन व्याघ्र संवर्धन उपक्रमांतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील T20-S-2 या सुमारे तीन वर्षांच्या तरुण वाघिणीचे यशस्वीरीत्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले आहे.त्यामुळे सह्यादी व्याघ्र प्रकल्पात "चंदा "च्या रूपाने पहिल्या वन लक्ष्मीचे आगमन झाले आहे.
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (TATR) व पेंच व्याघ्र प्रकल्प (PTR) येथील तीन नर व पाच मादी अशा एकूण आठ वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (STR) येथे स्थानांतरण करण्यास मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र वन विभागाने “ऑपरेशन तारा” या राज्यातील दीर्घकालीन व्याघ्र संवर्धन उपक्रमांतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील T20-S-2 या तरुण वाघिणीचे यशस्वीरीत्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरण केले आहे. भारतीय वन्यजीव संस्था यांच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
ताडोबातील खडसांगीची तरुण वाघीण
सुमारे तीन वर्षांच्या या तरुण वाघीणीला राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरणच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांनुसार ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खडसांगी परिक्षेत्रातून सुरक्षितरीत्या पकडण्यात आले. तिच्यावर योग्य पशुवैद्यकीय उपचार करण्यात आले.त्यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे समर्पित वन्यजीव वाहतुकीच्या वाहनातून स्थलांतरित करण्यात आले. हे यशस्वी स्थानांतरण महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. ताडोबा व सह्याद्री येथील पथकांनी केलेल्या समन्वित, वैज्ञानिक आणि जबाबदार कार्यामुळे हा प्रयत्न यशस्वी झाला आहे.
चंदाचे सोनार्लीत आगमन
सध्या त्या वाघिणीला शाहुवाडी तालुक्यातील सोनार्ली येथील बंदिस्त कुंपणात प्रायोगिक तत्त्वावर सोडण्यात आले आहे. पुढील टप्प्यांत वनात सोडण्यापूर्वी तिने तिथल्या परिस्थितीशी कसे जुळवून घेतले याचे निरीक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर जंगलात सोडण्यात येणार आहे. सध्याची संपूर्ण प्रक्रिया ही काटेकोर सुरक्षा मानदंड पाळून व सततच्या निरीक्षणाखाली पार पडली आहे..
पराक्रमी नावांनी सजलेल्या कुटुंबात आता ‘चंदा’चे आगमनाने
.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ‘सेनापती’, ‘सुबेदार’ आणि ‘बाजी’ अशा पराक्रमी नावांनी सजलेल्या वाघांच्या कुटुंबात आता ‘चंदा’च्या आगमनाने आणखी एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद भर पडली आहे. सह्याद्रीच्या सामर्थ्यशाली वारशाची साक्ष देणारी ही नावं जंगलातील प्रत्येक हलचालीला परंपरेचा नवा आयाम देत असून, व्याघ्र संवर्धनातील हा प्रवास अधिकच रोमहर्षक ठरणार आहे.
डॉ. आर. एस. खोब्रागडे यांनी केली वैद्यकीय देखभाल
या मोहिमेदरम्यान वाघिणीची प्रकृती चांगली राखण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर येथील वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. खोब्रागडे यांनी नेतृत्व केले.
“ऑपरेशन तारा हा सह्याद्रीसाठी ऐतिहासिक पुढचा टप्पा आहे. या वाघिणीच्या सॉफ्ट रिलीजमुळे सह्याद्रीतील वैज्ञानिक पुनर्स्थापना कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. आमच्या पथकाने ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत जबाबदारीने व सुरळीतरीत्या पार पाडली.भारतीय वन्यजीव संस्थेच्या च्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्यपूर्ण निरीक्षण करून सह्याद्रीला पुन्हा सक्षम व्याघ्र अधिवास बनवू.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सक्षम व्याघ्र अधिवास निर्माण करण्यासाठी वन विभाग सातत्यपूर्ण निरीक्षण, अधिवास सुधारणा व वैज्ञानिक पद्धतींच्या अंमलबजावणीस वचनबद्ध आहे.”
तुषार चव्हाण,(क्षेत्र संचालक-सह्याद्री व्याघ्र प्रकल्प)
“सह्याद्रीतील व्याघ्र पुनर्स्थापनासाठी हे स्थानांतरण हा एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. ताडोबा व सह्याद्रीच्या पथकांचे समन्वित, वैज्ञानिक आणि व्यावसायिक कार्य अभिनंदनास पात्र आहे.”
एम. एस.रेड्डी,(मुख्य वन्यजीव संरक्षक,महाराष्ट्र)
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .





.jpg)
0 Comments