शिराळा ता.१८नोव्हेंबर : मांगरुळ (ता.शिराळा) येथील चिंचेश्वर मंदिराशेजारील नागरी वसाहतीतल्या शांत सकाळी अचानक धडकी भरवणारी बातमी पसरली. शेतकरी भानूदास मस्के, सेवानिवृत्त पोलिसपाटील सादीक मस्के यांना बिबट्याचे पिलू दिसले!. क्षणभरात गावात गोंधळ उडाला. भीती, उत्सुकता आणि चिंता… आदी सगळ्या भावना एकाच वेळी. पण सर्वात जास्त घाबरलेला कोण असेल तर ते होते अवघ्या 'सहा महिन्यांचे' निष्पाप नर जातीचं बिबट्याचं पिलू...! ते सुरक्षित हाती लागल्याने पाच तासांचा जीव वाचवण्यासाठीचा श्वास रोखून धरलेला संघर्ष संपला आणि सुरुवात झाली त्याच्या सुरक्षिततेची...!
ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाला कळवले आणि पाच तासांचा संघर्ष सुरू झाला. सहाय्यक वनरक्षक (वनीकरण) सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळ्याचे वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी, वनपाल अनिल वाजे, बिळाशीचे वनरक्षक रजनीकांत दरेकर, दत्तात्रय शिंदे, प्राणीमित्र प्रा.सुशीलकुमार गायकवाड, तसेच वनसेवक मारुती पाटील, संजय पाटणकर, अमर पाटील या सर्वांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली.
गावकऱ्यांना सुरक्षित अंतरावर हलवून जेव्हा परिसर बंदिस्त केला गेला, तेव्हा पिलू मात्र घाबरून सतत जागा बदलत होते. एक छोटासा जीव… आईपासून हरवलेला होता. त्याच्या सभोवताली अनोळखी माणसांचा जणू महापूरच लोटला होता. आणि तरीही जगण्याची त्याची धडपड सुरूच होती. वनकर्मचाऱ्यांसाठी हा फक्त रेस्क्यू नव्हता तर एका अवलंबून असलेल्या जीवाला सुरक्षिततेचा हात देण्याची जबाबदारी होती.
गवतात दडून बसलेल्या पिलाचा शेवटी शोध रेस्क्यू टिमने शोध लावला आणि अत्यंत काळजीपूर्वक त्याला ताब्यात घेतले. रडणाऱ्या, थरथरणाऱ्या त्या छोट्या पिलाला उचलताना सर्वच रेस्क्यू टिम, वनविभागाचे पदाधिकारी, सर्व कर्मचा-यांच्या नजरेत एकच भावना होती “याला काहीही झाले नाही पाहिजे! ”पिलाला शिराळा येथील वनविभाग कार्यालयात आणून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली अरगडे, वनक्षेत्रपिल श्री पारधी यांनी प्रेमाने उपचार सुरू केलेत.
हा सारा उपक्रम उपवनसंरक्षक सागर गवते, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. रात्री उशिरा, एका विशेष वाहनातून त्या पिलाला पुण्यातील उपचार केंद्रात हलवण्यात आले. वाहन निघताना गावकरी आणि अधिकारी शांतपणे त्याकडे पाहत होते. एक वेगळीच भावना मनात…एक जीव वाचला...! एक प्रयत्न यशस्वी झाला आणि एक माणुसकीची कहाणी तयार झाली. बिबट्याच्या पिलासाठी हा दिवस भयाचा असला तरी माणसांनी हात पुढे केला आणि ते सुरक्षित जगण्याकडे निघून गेले हीच खरी मानवी संवेदनांची गोष्ट आहे.
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .





.jpg)
0 Comments