| शिराळा नगरपंचायत निवडणूक २०२५ | |||
|---|---|---|---|
| अर्ज | प्रभाग | बातम्या | मतदान टक्केवारी |
| नगराध्यक्ष | निकाल | नगरपंचायत बॉडी | लोकसंख्या,आरक्षण एकूण मतदान |
| नगरपंचायत प्रभाग तक्ता | ||
|---|---|---|
| प्रभाग 1 | प्रभाग 2 | प्रभाग 3 |
| प्रभाग 4 | प्रभाग 5 | प्रभाग 6 |
| प्रभाग 7 | प्रभाग 8 | प्रभाग 9 |
| प्रभाग 10 | प्रभाग 11 | प्रभाग 12 |
| प्रभाग 13 | प्रभाग 14 | प्रभाग 15 |
| प्रभाग 16 | प्रभाग 17 | निवडणूक बातम्या |
शिराळा, ता.२१ :शिराळा नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीतील माघार प्रक्रियेच्या अखेरच्या दिवशी आज एकूण ४८ उमेदवारांनी माघार घेतली. यात नगराध्यक्ष पदाचे ४ तर नगरसेवक पदाच्या ४४ उमेदवारांचा समावेश असल्याने निवडणुक रिंगणात नगराध्यक्ष पदासाठी ८ तर नगरसेवक पदासाठी ४९ असे एकूण ५७ उमेदवार उतरले आहेत.त्यामुळे येथे महायुती विरुद्ध राष्ट्रवादी आघाडी म्हणजे नाईक विरुद्ध नाईक-देशमुख-महाडिक गट अशी काटा लढत होणार आहे.
थेट नगराध्यक्ष पदासाठी या वर्षी पहिलीच बहुरंगी लढत असली तरी प्रत्यक्षात महायुती विरुद्ध राष्ट्रवादी आघाडी असा दुरंगी संघर्ष अधिक होणार आहे. दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची ही निवडणूक मानली जात असल्याने प्रचाराच्या रणधुमाळीला वेग आला आहे. स्थानिक मतदारसंघातील अनेक प्रभागांमध्ये दोन्ही आघाड्यांनी जोरदार रणनीती आखली असून उमेदवारांची संयोजना,प्रचारयोजना,पथनाट्यापासून सोशल मीडिया मोहिमांपर्यंत सर्व स्तरांवर तयारी सुरू केली आहे.
माघार प्रक्रियेत अपक्ष व सहयोगी पक्षांच्या उमेदवारांनी ‘सोयीचा प्रभाग दुरंगी लढत’ आणि ‘अडचणीचा प्रभाग – अपक्ष उमेदवार’ असा फॉर्म्युला राबविला आहे.काही प्रभागांमध्ये हा फॉर्म्युला यशस्वी ठरला तिथे सरळ दुरंगी लढत निर्माण झाली. तर काही ठिकाणी अपक्षांनी माघार न घेतल्याने बहुरंगी लढत निर्माण होऊन पक्षांच्या गणितांमध्ये बदल झाला. काही प्रभागांत पक्षातील समन्वयाचा अभाव दिसल्याने आखलेली यंत्रणाही काही प्रमाणत फेल झाली आहे.
शिराळा,ता.१८ नोव्हेंबर : शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख कार्यकर्ते विश्वास उर्फ बंडा कदम व सचिन चंद्रकांत शेटे यांनी घेतलेली पक्षविरोधी भूमिका मान्य नसून आम्ही त्यांना करणे दाखवला नोटीस दिली आहे. ही माहिती तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले की, शिराळा ग्रामपंचायत व नंतर नगरपंचायतीवर शिराळा विधानसभा मतदार संघातील पक्षाचे प्रमुख नेते मा. मानसिंगराव नाईक यांची सत्ता आहे. ती २०२५ निवडणुकीत कायम ठेवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्र पक्षांची आघाडीने लढवत आहे. त्याचे नेतृत्व माजी राज्यमंत्री मा. शिवाजीराव नाईक व मा. मानसिंगभाऊ करत आहेत. त्यामुळे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका ही पक्षातील सर्व उमेदवारांच्या विजयासाठी सर्वंकष प्रयत्न करणे, अशी असलीच पाहिजे.
पक्षाच्या भूमिकेशी निष्ठा न ठेवता श्री. विश्वास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार विरोधात लढणाऱ्या विरोधी पक्षातील त्यांच्या जावयास पाठिंबा दिला अथवा प्रचार करणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. याबाबत वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली आहे. तसेच सचिन शेटे यांनी अशीच भूमिका घेतली आहे. श्री. कदम व श्री. शेटे यांच्यावर पक्षविरोधी भूमिकेबद्दल कारवाई करण्याबाबत तालुकाध्यक्ष या नात्याने मला वरीष्ठांनी कळविले आहे. त्यानुसार नेते श्री. मानसिंगभाऊ व इतर सहकाऱ्यांना चर्चा करून त्यांना करणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याबाबत समाधानकारक खुलासा न आल्यास पुढील कठोर कारवाई करण्यात येईल.
शिराळा,ता.१५:नगराध्यक्ष पदासाठी उभ्या राहिलेल्या जावयाच्या उमेदवारीला मजबूत पाठबळ देण्यासाठी सासऱ्यांनी स्वतःचा पक्ष तात्पुरता बाजूला ठेवत थेट प्रचाराच्या रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.कौटुंबिक नातेसंबंध आणि स्थानिक राजकारणाचा समतोल साधत सासरे विश्वास कदम स्वतः जावयासाठी घराघरात भेटीगाठी घेऊन मतदारांशी संवाद साधणार आहेत.त्यामुळे या निवडणुकीत ‘कुटुंब विरुद्ध पक्ष’ असा वेगळाच राजकीय रंग शिराळा नगरपंचायत निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. याची कबुली सासऱ्यांनी आपल्या नेत्यांची परवानगी काढून प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.यामुळे स्थानिक राजकारणात नवीच चर्चा रंगू लागली आहे.
शिराळा येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख कार्यकर्ते व विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,पृथ्वीसिंग नाईक हे माझे जावई आहेत.ते शिवसेना(शिंदे गट) महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून शिराळा नगरपंचायतची निवडणूक लढवत आहेत.याबाबत मी आमचे मार्गदर्शक व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख नेते,माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्याशी चर्चा केली असून नगरपंचायत निवडणुकीपुरताच माझा हा निर्णय आल्याचे देखील मी त्यांना सांगितले आहे. आत्ता होणाऱ्या शिराळा नगरपंचायत निवडणुकीपुरता माझा हा निर्णय झालेला आहे.जावई म्हणून पृथ्वीसिंग नाईक यांना पाठिंबा देणे हे माझे कर्तव्य असल्याने मी व माझ्या कुटुंबातील सर्वजण पृथ्वीसिंग नाईक यांच्या प्रचारात सक्रिय असणार आहे.त्यात पुढे म्हटले आहे,२०१३ पासून आज पर्यंत मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे.त्यांनी दिलेली जबाबदारी मी नेहमीच प्रामाणिकपणे पार पाडली आहे.नगरपंचायत निवडणुकीनंतर देखील मी मानसिंगराव नाईक यांच्या विचारानेच काम करणार आहे.घरगुती नातेसंबंध असल्याने या निवडणुकीपुरता माझा हा निर्णय असेल.कदम यांच्या या निर्णयाने शिराळा नगरपंचायत निवडणुकीत वेगळा राजकीय रंग भरला असून त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेला या त्यांच्या भूमिकेमुळे पूर्णविराम मिळाला आहे.
दोन वर्षा पुर्वी शिराळा नगरपंचायतचे पहिले आरक्षण सर्वसाधारण पडले होते.तेव्हा विश्वास कदम हे राष्ट्रवादी काँग्रेस(श.प.)पक्षातून नगराध्यक्षपदासाठी प्रमुख इच्छुक होते. त्यानंतर गेल्या वर्षी त्यांच्या मुलीचा विवाह पृथ्वीसिंग नाईक यांच्याशी झाला.पृथ्वीसिंग नाईक हे ही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. पुन्हा आता दोन महिन्या फेर आरक्षण ही सर्वसाधारण पडले.त्यामुळे जावयासाठी सासऱ्यांनी माघार घेतली.आता तर तात्पुरता पक्षीय विचार बाजूला ठेवून जावयाच्या प्रचारात कुटुंबासह सक्रिय झाले.


0 Comments