BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नरभक्षक झालेल्या बिबट्यास ठार मारून शेतकऱ्यांना स्व संरक्षणासाठी शस्त्रपरवाने द्या.

 शिराळा,ता.३१:राजवीर पाटील या बालकाच्या मृत्यू प्रकरणी  शिराळा वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.नरभक्षक झालेल्या बिबट्यास ठार मारून शेतकऱ्यांना स्व संरक्षणासाठी शस्त्रपरवाने द्या.शेतीला दिवसा विज द्या अन्यथा सुरु असणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकू.गावात कोणत्या ही पक्षाच्या नेत्यांनी फिरू नये असा इशारा ही संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

बिऊर(ता.शिराळा)येथील राजवीर हणमंत पाटील(वय६)याचा बिबट्याच्या हल्ल्यात काल शुक्रवारी(ता.३०)मृत्यू झाला.त्यामुळे बिऊर ग्रामस्था संतप्त झाले आहेत.आज शनिवारी मृत राजवीर याच्या घरी ग्रामस्थ जमले होते.त्यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला.  

यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाटील म्हणाले, राजवीरच्या झालेल्या मृत्यू हा प्रशासनाने केलेला खून आहे.त्यामुळे त्यास जबाबदार असणाऱ्या वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.आम्हीं मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत.आम्हाला २५ लाखाची मदत नको,आम्हीच तुम्हाला २५ लाख देतो आम्हाला आमचा मुलगा द्या.

प्रकाश पाटील म्हणाले,आम्ही व आमचे पाळीव प्राणी त्यांच्या हद्दीत गेल्यास अथवा एखाद्या झाडाची फांदी तोडल्यास वनविभाग अटी आणि शर्ती घालून नियमांचे उल्लंघन झाले म्हणून आमच्यावर कारवाई करत असते.कोणतेही कारण नसताना शिकार केल्याचा ठपका ठेवून चार दिवस सकाळी आठ ते सहा वाजेपर्यंत काही तरुणांना वनविभागाने त्यांच्या कार्यालयात भांगलन करायला लावली.त्यांचे वन्यप्राणी गावात येवून मुलांचे जीव घेतात त्यावेळी त्यांचा कायदा कुठे असतो.? 

शहाजी पाटील म्हणाले,नरभक्षक बिबट्याला मारा हीच आमची मागणी आहे.सापळ्यांची संख्या वाढवा.कोणत्याही अटी शिवाय प्रत्येक ग्रामपंचायतीला बिबट्याला मारण्यासाठी शस्त्र परवाने द्या.

     आज दुपारी घटनास्थळी सहाय्यक वन संरक्षक नवनाथ कांबळे,वनपाल अनिल वाजे,वनरक्षक दत्तात्रय शिंदे,भिवा कोळेकर,संतोष कदम,पोलिस पाटील सीताराम पाटील यांनी भेट देवून घटनेचा पंचनामा केला.

दिवसा युवकावर हल्ल्याचा प्रयत्न 

आज(ता.३१)उपवळे येथील पृथ्वीराज मोहन पाटील हा युवक सकाळी दहाच्या सुमारास घरच्या पाठीमागे उभा होता.त्यावेळी त्यास माकडांच्या कळपाचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू आला.त्यादिशेने तो पाहत असताना अचानक समोर आलेल्या बिबट्याने गुरगुरून त्याच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला.त्याने आरडाओरड केला असता संतोष कदम,प्रवीण पाटील,विकास पाटील,अजित पाटील यांनी धाव घेऊन त्यास हुसकावून लावले. तो नर भक्ष बिबट्याच असावा असा ग्रामस्थांचा अंदाज आहे.

हल्ला करण्यापूर्वी बिबट्या दिसला होता. 

शुक्रवारी (ता.३०)राजवीर वर हल्ला होण्यापूर्वी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास कदमवाडी हद्दीवर असणऱ्या पलीकडील माळ नावच्या शेतात ट्रॅक्टर चालक दत्तात्रय सर्जेराव पाटील यांना बिबट्या दिसला.त्यांनी त्याचे चित्रीकरण ही केले आहे.त्यांनी याची मोबाइलवरून कल्पना गावात दिली त्यानंतर सात वाजता राजवीरवर हल्ला झाल्याची घटना घडली..


 


व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....





View this post on Instagram

A post shared by shivaji chougule (@shivajichougule91)


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .



  


Post a Comment

0 Comments