BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नरभक्षक बिबट्यास पकडण्यासाठी लावले पिंजरे

 


शिराळा, ता.३१ :बिऊर (ता.शिराळा) येथील अमृतनगर परिसरात राजवीर हणमंत पाटील या सहा वर्षीय बालकावर हल्ला करून नरभक्षक झालेल्या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वन विभागाने व्यापक उपाययोजना सुरू केल्या आहेत.घटना घडलेल्या ठिकाणासह तडवळे,उपवळे व बिऊर परिसरात एकूण सहा पिंजरे लावण्यात आले असून त्यामध्ये सहा बोकड ठेवण्यात आले आहेत.तसेच बिबट्याच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी तीन ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

घटनास्थळी सहाय्यक वन संरक्षक नवनाथ कांबळे, वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, भिवा कोळेकर, संतोष कदम व इतर वनकर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. बिबट्याचा वावर ज्या ठिकाणी असल्याची शक्यता आहे त्या परिसराची माहिती स्थानिकांकडून घेऊन पिंजरे लावण्याचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. दिवसरात्र गस्त वाढविण्यात आली असून त्यासाठी बाहेरी वन कार्यालयातून कर्मचारी मागविले आहेत.  बिबट्याच्या हालचालींबाबत मिळणाऱ्या प्रत्येक माहितीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात आहे.दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संभाव्य धोका लक्षात घेता वन विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी एकटे शेतात जाणे टाळावे, कामासाठी जाताना किमान दोन-तीन जणांनी एकत्र जावे, तसेच मुलांना घराबाहेर,अंगणात किंवा शेताजवळ एकटे सोडू नये,असे आवाहन करण्यात आले आहे. संध्याकाळनंतर अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, अशी सूचनाही देण्यात आली आहे.वन विभागासोबतच शिराळा पोलिसांनीही तडवळे, उपवळे व बिऊर परिसरात गस्त वाढविली आहे. पोलिसांकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पाटील,पोलीस हवलदार अरुण मामलेकर,अनुज पाटील, उपस्थित होते. नरभक्षक बिबट्यास लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.


व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....





View this post on Instagram

A post shared by shivaji chougule (@shivajichougule91)


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .



  


Post a Comment

0 Comments