BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

५९ सिलेंडर जप्त 59 cylinders seized



शिराळा,ता.१०: शाहुवाडी तालुक्यातील  चहा टपरी, हॉटेल, ढाबे, चायनिज खादयपदार्थाचे हातगाडे या ठिकाणी घरगुती वापराचे सिंलेडरचा वापर होत असलेचे निदर्शनास आले.त्यामुळे  मंडल निहाय जिवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ अंतर्गत पथकाने टाकलेल्या धाडीत ५९ सिलेंडर धारकावर कारवाई करण्यात आली आहे.

 याबाबत  उपविभागीय अधिकारी, पन्हाळा यांनी  तहसीलदार यांना निर्देश दिले होते.त्या नुसार तहसीदार रामलिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर,बांबवडे,सरूड, आंबा या चार मंडल अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांची  पथके तयार करण्यात आली आहे. त्या माध्यमातून चहा टपरी, हॉटेल, ढाबे, चायनिज खादयपदार्थाचे हातगाडे या ठिकाणी घरगुती वापराचे सिंलेडरचा वापर होत असलेचे आढळून आले. त्यामध्ये  मलकापूर-१८ ,बांबवडे-२१ ,सरूड-१० , आंबा- १० असे एकूण ५९ सिलेंडर जप्त केले आहेत.   

Post a Comment

0 Comments