BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जुन्या काळातील आरोग्य दूत हरपला The messenger of health of old is lost

 


शिराळा : जुन्या काळात पुरेशी रस्त्याची सुविधा नाही.नदी,ओढ्यावर पूल नाही .पुरेशी वाहने नाहीत. बह्तांशी प्रवास हा पायीच व्हायचा .अशा खडतर काळात  शिराळा पश्चिम भागातल्या रुग्णांना  वैद्यकीय दूत भेटला. हजारो लोकांना आपणाला शक्य असेल ती सेवा त्यांनी पुरवली. मात्र नियतीने हा  आरोग्य सेवेचा दूत काल बुधवारी हिरवून नेला.त्यांच्या जाण्यामुळे अनेक वयोवृद्ध रुग्णांच्या  डोळ्याच्या पापाण्या आपोआप ओलावल्या.असा हा  सर्वांचा आरोग्य दूत  म्हणजे डॉ.भगवान पाटील.त्यांना सुशिक्षित लोक बी.आय.पाटील तर अडाणी लोकं  भगवान डॉक्टर म्हणून ओळखायचे. त्यांना लोक भाऊ या नावाने हाक मारत.त्यांचा सदैव हसतमुख  असणारा चेहरा आणि त्यांच्या कडून  मिळणारा धीर यामुळे त्यांच्याकडे जाणाऱ्या रुग्णांचा निम्मा आजार तिथेच बारा व्हायचा.  अशा या लोकांच्यासाठी देव माणूस असणाऱ्या भाऊंच्या बद्दल लिहिलं तिथके कमीच आहे. मात्र त्यांना पाहिलेल्या प्रत्येकाच्या मनात त्यांच्या बद्दल असणारी ही प्राथमिक स्वरूपातील शाब्दिक तळमळ व्यक्त केल्याशिवाय रहावत नाही.म्हणून त्यांच्या कार्याचा हा घेतलेला थोडक्यात आढावा.

१९७० पूर्वी  पासून ते आरळा येथे वैद्यकीय सेवा करत होते. त्यांचे मुळं गाव शाहूवाडी तालुक्यातील शिराळे वारूण त्याला डिगे शिराळे म्हणून ओळखले जाते. शिराळे वारूण व आरळा दोन गावांच्या मध्ये वारणा नदी आहे.वारणा नदीवर सध्याचा शित्तूर -आरळा  पूल नव्हता. त्यामुळे शाहुवाडी तालुक्यातील सोंडोली , विरले, मालगाव, खेडे ,शिराळे वारुण ,शित्तूर , व  वाड्या वस्त्या,उदगिरी , ढवळेवाडी ,उखळू, शिराळा तालुल्यातील खुंदलापूर ,मणदूर,सोनवडे,आरळा,गुढे,पाचगणी, करुंगली,मराठेवाडी काळुंद्रे ,चिंचेवाडी, ढाणकेवाडी, अशा अनेक वाड्या वस्त्यावर भाऊनी आरोग्य सेवा पुरवली. ज्यांची मुलं मुंबई ला असायची.त्यांच्या घरातील वयोवृद्ध लोकांच्यावर डॉक्टर पैसा असला नसला तरी उपचार करायचे. मुलं मुंबईवरून वर्षाने परत आल्यानंतर त्यांची उधारी भागवत असत.पैशाचा विचार न केल्याने व चांगल्या प्रकारे सेवा दिल्याने त्यांनी प्रत्येक माणसाच्या मनात आपुलकीचे घर निर्माण केले. ऊन,वारा ,पाऊस याची तमा न बाळगता त्यांनी अखंडपणे प्रामाणिक सेवा केली. पैशाला महत्व न देता उपचाराला महत्व देवून जन माणसात आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली. अशा या आरोग्य दुताला तमाम भावपूर्ण श्रद्धांजली. रक्षा विसर्जन उद्या शुक्रवारी ७ जून रोजी त्यांच्या मुळगावी शिराळे वारुण येथे आहे.

भाऊ तुमच्या आत्म्याला चिरशांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

 आपल्याला मानणारा सर्व जनसमुदाय 


 लोकसभा एकत्रित निकाल 

खालील नावावर क्लिक करून माहिती मिळावा
सांगली व हातकणंगले लोकसभा मतदार संघ
सांगलीहातकणंगले
संजयकाका पाटीलराजू शेट्टी
विशाल पाटीलधैर्यशील माने
चंद्रहार पाटीलसत्यजित पाटील
तालुका निहाय मतेतालुका निहाय मते
उमेदवार निहाय मतेउमेदवार निहाय मते
महाराष्ट्रचा निकाल

Post a Comment

0 Comments