शिराळा,ता.१७ :चांदोली परिसरात वन्यजीव संशोधक व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी दोन दिवसाचा दौरा केला. मात्र त्यांच्या या दौऱ्या बाबत सर्वच पातळीवर कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.आज मंगळवार (ता.१७) रोजी दुपारी बाराच्या दरम्यान ते कोल्हापूरकडे वैयक्तिक सुरक्षा रक्षक व सहकाऱ्या समवेत रवाना झाले.
रविवारपासून ठाकरे यांनी जाधववाडी येथील चांदोली रिसॉर्टला मध्ये येऊन दोन दिवस मुक्काम केला होता. या दरम्यान त्यांनी वन्यजीव अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने उदगीरी, झोळंंबी ,वाल्मिक ,गुढे पाचगणी पठार यांना भेटी देऊन पाहणी केली.त्यांनी अभ्यास दौऱ्या सोबत चांदोली धरण व व्याघ्र प्रकल्पाच्या मुक्त हस्त उधळण असणऱ्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटला. मात्र गेले तीन दिवस धरण व पाणलोटक्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी भेटी देण्यास व्यत्यय आला.
गेल्या वर्षी तेजस ठाकरे आणि ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनने पालीच्या नव्या दोन प्रजातींचा शोध लावला होता. ठाकरे फाऊंडेशनच्या या शोधाची दखल फोर्ब्स मासिकाकडून घेण्यात आली आहे. त्यांची चांदोली येथे व्यवस्था चांदोली रिसॉर्टलाचे श्रेयस पाटील,सुनील चव्हाण,डॉ.अतुल मोरे , व्यवस्थापक किरण परदेशी यांनी केली होती.


.jpg)

0 Comments