BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

एक तरी क्रीडा प्रकार जोपासा

 


 आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .


शिराळा  :- मन,मेंदू आणि मनगट बळकट करावयाचे असेल तर खेळ महत्वाचा आहे. प्रत्येकांनी आपले शिक्षण,नोकरी व व्यवसाय सांभाळत कोणता ही एक क्रीडा प्रकार जोपासला तर उत्तम व्यायाम होऊन निरोगी जीवन जगण्यास मदत होईल असे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले.

    शिराळा येथे ३२ शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नूतन पदाधिकारी यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते. यावेळी देशमुख म्हणाले,शिराळा तालुक्याला कला,क्रीडा,सांस्कृतिक असा मोठा वारसा आहे.हिंद केसरी अर्जुनवीर पै.गणपतराव आंदळकर यांनी कुस्तीच्या माध्यमातून शिराळा तालुक्याचा लैकिक वाढविला आहे.तालुक्यातील अनेक गावात कुस्तीची परंपरा कायम जोपासली जात आहे.आता क्रिकेट क्षेत्रात मांगले येथील विजय पावले यांच्या माध्यामतून तालुक्याचा लौकिक वाढू लागला आहे.अनेक शालेय मुलांनी शालेय क्रीडा प्रकारातून राज्यस्तरा पर्यंत झेप मारली आहे. खेळातून ही आपले नशीब अजमावता येत असल्याने शालेय मुलांनी आपल्या आवडीच्या क्रीडा प्रकारात रस घेवून आपले भविष्य घडवण्यासाठी प्रयत्नशील रहावे.

यावेळी ३२ शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रतिक पाटील (शिराळा),उपाध्यक्ष सोमनाथ नायकवडी(चरण),प्रमोद पाटील (कोकरूड ),बाबासो पाटील (पाडळीवाडी ),सचिव हर्षवर्धन पाटील (बिऊर), सह सचिव अनिरुद्ध माने (कोकरूड),कार्याध्यक्ष अमित पाटील (पणुंब्रे), सह कार्याध्यक्ष विजय यादव (खिरवडे ),खजिनदार अर्जुन कांबळे (वाकुर्डे ) सह खजिनदार अमोल गोसावी (शिराळा ),नियोजन प्रमुख विठ्ठल मिरुखे (मणदूर )सह नियोजन प्रमुख शामराव नायकवडी (चरण ),प्रसिद्धी प्रमुख दत्ता तडाखे (मांगले ),सह प्रसिद्धी प्रमुख जयदीप पाटील (पाडळी) यांचा सत्कार आमदार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी असोसिएशनचे संस्थापक अमीर मुलाणी,प्रवीण कांबळे,संजय घोडे,हेमंत जाधव अमर जाधव,राजेंद्र हिरवडेकर, संदीप पाटील,पोपट नायकवडी,बाबासो पाटील,विजय माने,विजय जाधव,विजय पावले,सुहास खोत,प्रमोद पाटील,विकास खोत,अभिजित मस्के,कुंडलिक खांडेकर,प्रकाश नांगरे, अरविंद सातपुते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments