शिराळा,ता.३:शिराळा तालुक्यातील हजारो रुग्णासाठी सेवा देणारी १०८’ रुग्णवाहिका ही सामान्य कुटुंबाची जीवनदायिनी ठरली आहे.मागील आठवड्यामध्ये कुसाईवाडी पैकी हूंबरवाडी येथील वृद्ध महिला इंदुबाई खोत(वय ८०) यांना मेंदू विकाराचा झटका आल्याने त्या बेशुद्ध पडल्याने त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने १०८ रुग्णवाहिका व डॉक्टरांनी इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारास दाखल केले.पुन्हा हुंबरवाडी येथे पोहोचवले.त्यामुळे १०८ रुग्ण सेवेबाबत तालुक्यामध्ये समाधानकारक चर्चा होत असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले.
शिराळा तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांच्यासाठी १०८’रुग्णवाहिकेची सेवा ही जीवनदायिनी ठरली असल्याने जिल्हा व्यवस्थापक डॉ.कौस्तुभ घाटूळे यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचा माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.
नाईक म्हणाले,शिराळा हा डोंगरी तालुका असल्यामुळे ग्रामीण विभागात रुग्णांना उपचारासाठी किंवा रुग्णालयात नेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी मोबाईलची रेंज नसल्यामुळे उपचारासाठी वाहनाची व्यवस्था न झाल्यामुळे अनेक दुःखद घटना घडल्या आहेत.महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस (एमईएमएस) या प्रकल्पांतर्गत राज्यात ‘डायल १०८’ रुग्णवाहिकेची सेवा सुरू केल्यामुळे तालुक्यातील हजारो रुग्णांसाठी ही सेवा जीवनदायिनी ठरली आहे. हुंबरवाडी येथे इंदुबाई खोत या निराधार असल्याने एकट्याच राहत होत्या. त्यांना मेंदूविकाराचा तीव्र झटका आला होता.मात्र त्या आठवड्यामध्ये मॉन्सून पुर्व पावसामुळे ओढ्यावरील रस्ता वाहून गेल्याने तिथे वाहन जातं नव्हते.त्यामुळे ग्रामस्थ व १०८ रुग्णवाहिकेचे कर्मचारी यांनी स्ट्रेचर वरून चौघानी अर्धा किलोमीटर अंतर चालत आणून इंदुबाई यांना रुग्णवाहिकेत बसून इस्लामपूर येथे खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यासाठी दाखल केल्याने त्यांचा प्राण वाचला.उपचारा नंतर त्यानं पुन्हा गावी सोडले.
यावेळी जिल्हा व्यवस्थापक डॉ.कौस्तुभ घाटुळे,विलास शिंदे,अजित सूर्यवंशी,संतोष गायकवाड,भारती सावंत,डॉ आशिष शिंदे,डॉ आनंद पाटील,रत्नाकर कुंभार,अशोक कदम,प्रसाद कांबळे,अशोक गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी करमाळे सरपंच सचिन पाटील,माजी सरपंच विनोद पन्हाळकर,रघुनाथ पाटील,विजय महाडिक,भगवान मस्के, स्वप्निल पाटील,सत्यवान पाटील,सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष चंद्रकांत पाटील,हिम्मत पाटील उपस्थित होते.
0 Comments