शिराळा, ता. ४: भाशिरगाव चे ग्रामपंचायत अधिकारी सचिन मोरे यांनी ग्रामपंचायतीला बेकायदेशीररित्या टाळे ठोकल्याप्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल केला. मात्र टाळे ठोकणाऱ्या एकूण १२ जणांपैकी फक्त ५ जणांवरच गुन्हा का दाखल केला? आणि इतर ७ जणांना ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी पाठीशी घालण्याचे कारण काय? अशी विचारणा करत त्या ७ जणांवर गुन्हा दाखल करावा व प्राथमिक माहिती अहवालाची सुधारित प्रत आंदोलनस्थळी सादर करावी, त्यानंतरच हे आंदोलन मागे घेऊ असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायत कार्यालयास बेकायदेशीररित्या टाळे ठोकल्याबद्दल संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी भाटशिरगाव येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकारी गेल्या ५ दिवसांपासून पंचायत समिती, शिराळा समोर आंदोलन सुरु आहेत. या गुन्ह्याच्या प्राथमिक माहितीचा अहवाल व गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचे पत्र घेऊन पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र आंदोलकांनी ग्रामपंचायतीला ठोकणाऱ्यांचे फोटो व उपस्थिती बाबतचे पुरावे, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा अहवाल उपलब्ध असताना १२ पैकी फक्त ५ जणांच्यावर गुन्हे दाखल न करता इतर ७ जणांच्यावर ही दाखल करा अशी मागणी करून गटविकास अधिकारी यांना उर्वरित ०७ जणांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात ग्रामपंचायत अधिकारी सचिन मोरे यांना निर्देश देण्याबाबत निवेदन दिले. आंदोलनास यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक यांनी भेट देऊन आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक प्रवीण पाटील यांनी आंदोलनास भेट देऊन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून आंदोलकांना न्याय देण्याची मागणी केली. युवक क्रांती आघाडीचे समन्वयक कैलास देसाई यांनी दूरध्वनीवरून जिल्हाधिकारी काकडे यांच्या कानावर आंदोलकांच्या सर्व मागण्या घातल्या. यावेळी काकडे यांनी सोमवारी भेटण्यासाठी या असे आंदोलकांना सांगितले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी तप्ती धोडमिसे यांना भेटन चर्चा करण्याचे सुचविले.
याप्रसंगी भाटशिरगांवचे सरपंच भगवान भंडारे, उपसरपंच संजय देसाई, सदस्या कमल देसाई, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सर्जेराव देसाई, माजी अध्यक्ष भिमराव देसाई, बाजीराव देसाई, सेवा सोसायटीचे संचालक दत्तात्रय पाडळकर, डि.वाय. लॅंड सर्वेअर्सचे संचालक अजित देसाई, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल आलुगडे, अर्जुन आलुगडे, महादेव देसाई, दत्तात्रय मोरे, महादेव देसाई, अंकुश देसाई, भगवान देसाई, सतीश अस्वले, शांताबाई अस्वले, मंगल भंडारे, अंजना भंडारे, सुरेखा देसाई, शोभा देसाई, स्वाती देसाई, मनिषा देसाई, विमल देसाई, पूजा देसाई, अमित देसाई, शनिराज आलुगडे, संभाजी जगताप, शनिराज आलुगडे, विकास मोरे, ओंकार देसाई, प्रसाद देसाई, सिद्धांत देसाई आदी उपस्थित होते.
0 Comments