शिराळा,ता. : शिराळा तालुक्यासह चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर तीन दिवसा पासून वाढला आहे.२४ तासात चांदोली येथे ४९ मी.मी.पाऊस झाला आज अखेर ११५९ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात २५.३१ टी.एम.सी पाणीसाठा झाला आहे. धरणात ६१६.७० मीटर पाणी पातळी तर पाणीसाठा ७१६.८३६ द.ल.घ.मी झाला असून धरण ७३.५८ टक्के भरले आहे. गत वर्षाच्या तुलनेतधरणात दुप्पट पाणीसाठा झाला आहे.
गत वर्षी १२.१९ टीएमसी पाणीसाठा होता .आता यावर्षी २५.३१ टीएमसी पाणीसाठा झाल्याने गत वर्षाच्या तुलनेत १३.१२ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.धरणात ९७५४ कुसेसने पाण्याची आवक सुरु असून विद्युत निर्मितीमधून १६४५ कुसेसने विसर्ग सुरु आहे.गत वर्षी ५९५ मी.मी. पाऊस झाला होता.यावर्षी ११५९मी.मी.पाऊस झाल्याने गत वर्षाच्या तुलनेत या वर्षी ५६४ मी.मी.पाऊस जास्त झाला आहे.शिराळा तालुक्यातील कोकरूड व शाहुवाडी तालुक्यातील रेठरे दरम्यानचा वारणा नदीवरील बंधारा १३ दिवसापासून पाण्याखाली असल्याने दोन्ही तालुक्यातील काही गावांचा जवळचा संपर्क तुटला आहे.
शिराळा येथील मोरणा धरण व वाकुर्डे बुद्रुक(करमजाई),अंत्री बुद्रुक(मानकरवाडी), शिवणी,टाकवे ,रेठरे धरण येथील तलाव असे एकूण पाच तलावात पूर्ण क्षमतेने भरले आहे. अद्याप कार्वे तलाव भरलेला नाही..तालुक्यातील ४९ तलावा पैकी ४७ ;तलाव जून महिन्यात १०० टक्के भरले आहेत.
मंडलनिहाय पडलेला पाऊस कंसात एकूण पाऊस मिली मीटर मध्ये असा...
कोकरूड २४.५ (५३)
शिराळा - (१४.३ )
शिरशी ८.५ (३०.५ )
मांगले -७.८ (२२.१)
सागाव - ५.५(२६ )
चरण ३१.८ (७७.६ )
वारणावती ४९ (११५९ )
0 Comments