शिराळा,ता.३० :वाघाचे अन्नसाखळीतील अनन्य साधारण महत्व आणि सह्याद्री व्याघ्र राखीव मध्ये असणारा वाघांच्या अस्तित्वा बाबतचा चढता आलेख कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूरचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी केले.
जागतिक व्याघ्र दिनानिमित्त वन परिक्षेत्र आंबा येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी या कार्यालयाच्या अंतर्गत डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना अंतर्गत स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, पशु संसाधनाचा विकास, जल संसाधनाचा विकास, कृषी संसाधनाचा विकास व स्वच्छता अभियान अंतर्गत स्थानिक १३८ लोकांना कृषी पूरक अवजारे, रोटावेटर,७ एचपी विडर, सात एचपी इंजिन पंप सेट, ब्रश कटर मशीन, भात मळणी मशीन तर स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून महिला बचत गट यांना शेवया मशीन, शिलाई मशीन, भात कांडप यंत्र, आटा चक्की, पशुसंसाधनाच्या विकास मधून कडबा कुट्टी मशीन, चार भाकड जनावरे विकून एक दुधाळ जनावर घेणे,स्वच्छता अभियानांतर्गत लोकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याची फिल्टर्स बम,मानव वन्य जीव संघर्ष कमी करण्यासाठी सोलर स्ट्रीट लाईट, होम स्वीट लाईट या साहित्याचे वाटप करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक किरण जगताप यांनी केले.यावेळी गोकुळ दूध संघ संचालक,कर्णसिंग गायकवाड,जिल्हा परिषदचे माजी सभापती सर्जेराव पाटील ,शाहुवाडी पंचायत समितीचे माजी सभापती अमर खोत , सह्याद्री व्याघ्र राखीव कोयनाचे उपसंचालक किरण जगताप ,चांदोलीच्या उपसंचालक स्नेहलता पाटील ,विभागीय वनाधिकारी वन्यजीव कोल्हापूरचे श्रीकांत पवार,चांदोलीचे सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे,ढेबेवाडीचे सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील, वनक्षेत्रपाल प्रदीप कोकितकर,गिरीश पंजाबी, रमण कुलकर्णी, रोहन भाटे उपस्थित होते.सूत्रसंचलन दत्तात्रय बोळावे यांनी केले. आभार स्नेहलता पाटील यांनी मानले.
चांदोली येथे वृक्षारोपण
जागतिक व्याघ्रदिना निमित्त सह्याद्री राखीव व्याघ्र प्रकल्प चांदोली व गांधी सेवाधाम विद्यालय आरळा ( ता. शिराळा ) यांच्या संयुक्त विद्यमानाने चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी शिक्षक सुधीर बंडगर यांनी झाडांचे व वाघांचे महत्व या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जांभूळ , वाळवा , करंज , चिंच , शिसम ,आवळा इत्यादी झाडे लावण्यात आली. यावेळी वनक्षेत्रपाल ऋषिकेश पाटील , मुख्याध्यापक ए. एस. घोरपडे , पर्यवेक्षक एच. ए. मुलाणी ,वनपाल विजय दाते , शिवाजी पाटील , उस्मान मुल्ला वनरक्षक अक्षय जायभाय , सुभाष पाटील , सुभाष वसावे , कविता सांवत , हर्षदा साठे , तेजश्री नरळे ,रवींद्र खंडागळे , वन कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments