साम टीव्ही ची बातमी पाहण्यासाठी याच हेडिंगवर क्लिक करा
शिराळा: (आज ६ जुलै माहिती)सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात अतिवृष्टी झाली असून चोवीस तासात ७२ मी.मी.तर आज अखेर १३६४ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. एका दिवसात धरणात १ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. धरणात २६.९६ टी.एम.सी पाणीसाठा झाला आहे. ६२०,०५ मीटर पाणी पातळी तर पाणीसाठा ७९१.७३६ द.ल.घ.मी झाला आहे.धरणात ८१.२७ टक्के पाणीसाठा आहे.धरणात १२०५२ कुसेक पाण्याची आवक सुरु असल्याने सांडव्यातून २८७० तर विद्युत निर्मितीमधून १६३० असा एकूण ४५०० कुसेक विसर्ग वारणा नदीत सुरु आहे.त्यामुळे वारणा काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
0 Comments